________________
तृतीय अधिकार
द्रव्यांचा परस्पर उपकार धर्मस्य गतिरत्र स्यायदधर्मस्य स्थितिर्भवेत् । उपकारोऽवगाहस्तु नभसः परिकीर्तितः ॥ ३० ।। पुद्गलानां शरीरं वाक् प्राणापानौ तथा मनः । उपकारः सुखं दुःखं जीवितं मरणं तथा ॥ ३१ ॥ परस्परस्य जीवानामुपकारो निगद्यते । उपकारस्तु कालस्य वर्तना परिकीतिता ॥ ३२ ॥
अर्थ- गमन करण्यास तत्पर अशा जीव पुद्गलाना गमन करण्यास सहायभूत होणे हा धर्मद्रव्याचा उपकार आहे.
स्थिर राहण्यास उद्युक्त अशा जीव-पुद्गलाना स्थिर राहण्यास सहायभूत होणे हा अधर्म द्रव्याच्या उपकार आहे. जीवादि सर्व द्रव्याना राहण्यास अवगाह देणे हा आकाश द्रव्याचा उपकार होय.
शरीर-वाणी-श्वासोच्छ।स व मन, तसेच सुख-दुःख, जन्म-मरण, हा पुद्गलांचा जीवावर व जीव संबंधी पुद्गलावर व पुद्गलांचा अन्य पुद्गलावर उपकार आहे.
जीवांचा अन्य जीवावर जो परस्पर सुख-दुखादिव-जन्म-मरणास निमित्तभूत उपकार किंवा अपकार तो सर्व निमित्तमात्र उपकार म्हटला जातो.
काल द्रव्य सर्व द्रव्यांचे जे प्रतिसमय परिणमन होते त्यास वर्तना मात्र निमित्त होणे हा काल द्रव्याचा उपकार आहे.
धर्म द्रव्य लक्षण क्रियापरिणतानां यः स्वयमेव क्रियावतां आदधाति सहायत्वं स धर्मः परिगीयते ।। ३३ !! जीवानां पुद्गलानां च कर्तव्ये गत्युपग्रहे । जलवन्मत्स्यगमने धर्मः साधारणाश्रयः ।। ३४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org