________________
तत्वार्थसार
एक प्रदेशामध्ये अनेक परमाणूंचा अवगाह अवगाहन सामर्थ्यात् सूक्ष्मत्वपरिणामिनः । तिष्ठन्त्येकप्रदेशेऽपि बहवोऽपि हि पुद्गलाः ॥ २६ ।। एकापवरकेऽनेक प्रकाशस्थिति दर्शनात् । न च क्षेत्रविभागः स्यान्न चैक्यमवगाहिनां ।। २७ ।।
अर्थ- अवगाहन गुण सामर्थ्यामुळे पुद्गल परमाणु सूक्ष्मत्व परिणामाला धारण करून आकाशाच्या एका प्रदेशात देखील अनेक पुद्गल परमाणु राहू शकतात.
ज्याप्रमाणे एकाच खोलीमध्ये अनेक दीपकांचा प्रकाश एकत्र राहू शकतो त्याप्रमाणे अनेक परमाणु भिन्न भिन्न क्षेत्रात न राहता आपापले भिन्न द्रव्यत्व कायम ठेवून एकरूप न होता एकाच प्रदेशात राहू शकतात.
शंका - समाधान अल्पेऽधिकरणे द्रव्यं महीयो नावतिष्ठते । इदं न क्षमते युक्ति दुःशिक्षितकृतं बचः । २८ ॥ अल्पक्षेत्रे स्थितिर्दृष्टा प्रचयस्य विशेषतः ।
पुद्गलानां बहूनां हि करीषपटलादिषु ॥ २९ ॥ अर्थ- शंका येथे शंकाकार शिष्य प्रश्न करतो की एकप्रदेशरूप लहान अवगाह क्षेत्रामध्ये अनेक परमाण कसे राहतात ? समाधान - या शंकेचे समाधान करताना आचार्य म्हणतात की विचार न करतां केलेला प्रश्न युक्तियुक्त वाटत नाही. एका गोवरीतून निघालेला धूम पटल आकाशामध्ये केवढा मोठा पसरलेला दिसतो. त्याप्रमाणे अल्प क्षेत्रात देखील पुष्कळ पुद्गल परमाणूचा अवगाह बाधक ठरत नाही. आकाशाच्या एका प्रदेशामध्ये व एक प्रदेशस्थित एका पुद्गल परमाणूमध्ये अशी अवगाहन शक्ती असते की अनेक परमाणू देखील तेवढ्याच क्षेत्रात अवगाह करू शकतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org