________________
तत्वार्थसार
पुद्गल द्रव्याशी संसारी जीवाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत जीव उपचाराने मूर्त म्हटला जातो. याप्रमाणे मूर्त कर्माचा मूर्त जीवाशीच संबंध होतो अमूर्त शुद्ध जीवाशी कर्माचा सबंध होत नाही.
द्रव्याची संख्या धर्माधर्मान्तरिक्षाणां द्रव्यमेकत्वमिष्यते । कालपुद्गलजीवानां अनेकद्रव्यता मता ॥ १७ ।।
अर्थ- धर्म द्रव्य अधर्म द्रव्य आकाश द्रव्य ही प्रत्येकी एक एक द्रव्ये आहेत. काल द्रव्य लोकाकाश प्रदेश प्रमाण असंख्यात आहेत. लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर एक एक कालाणु द्रव्य स्थित आहे. जीव द्रव्य अनंतानंत आहेत साधारण वनस्पति एकेंद्रिय जीवच फक्त अनंतानंत आहेत. बाकी प्रत्येक वनस्पति पथ्वीकाय जलकाय बायकाय अग्निकाय द्वींद्रिय त्रींद्रिय चतुरिद्रिं असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच, देव व नारकी सर्व जीव असंख्यातच आहेत. मनुष्यामध्ये लब्ध्य पर्याप्तक जीव असंख्यात आहेत. पर्याप्त मनुष्य संख्यात आहेत. एक एक संसारी जीवद्रव्याशी अनंतानंत पुद्गल द्रव्याचा संबंध असल्यामळे पुदगल द्रव्य जीवद्रव्य राशीच्या अनंतपट आहे.
द्रव्यामध्ये सक्रिय निष्क्रिय भेद धर्माधमौं नभः कालश्चत्वारः सन्ति निष्क्रियाः । जीवाश्च पुद्गलाश्चैव भवन्त्येतेषु सक्रियाः ॥ १८ ॥
अर्थ- धर्म अधर्म आकाश व काल हे निष्क्रिय आहेत. आकाशाच्या एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर गमन तिला क्रिया म्हणतात. जीव व पुद्गल यांच्यामध्ये क्रियावती शक्ति असल्यामुळे ते सक्रिय आहेत. संसारी जीव कर्माच्या संयोगात चतुर्गति भ्रमण क्रिया करतात. मुक्त जीव ऊर्ध्वगमन स्वभावामुळे लोकाच्या अंतापर्यंत गमन करून सिद्ध शिलेवर शाश्वत विराजमान असतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org