________________
तत्वार्थसार
ध्रुवस्वरूप नित्य तत्स्वरूप म्हटली जाते. पूर्वोत्तर पर्यायामध्ये ' तो च हा ' असा अन्वयरूप वस्तूचा जो तद्भाव प्रत्यभिज्ञानाने जाणला जातो त्यालाच ध्रुवत्व म्हणतात.
द्रव्य द्रव्यरूपाने सदासुव्यवस्थित आहे
इयत्तां नातिवर्तन्ते यतः षडपि जातुचित् । अवस्थितत्वमेतेषां कथयन्ति ततो जिनाः ।। १५ ।।
अर्थ - ज्याअर्थी ही सहा प्रकारची द्रव्ये आपली द्रव्यमर्यादा उल्लंघन करून कमी जास्त होत नाहीत, सत्चा कदापि नाश होत नाही. असत् चा कदापि उत्पाद होत नाही. सत् स्वरूप सर्व द्रव्ये सदा सत्रूपाने विद्यमान राहतात त्याअर्थी जितेंद्र भगवंतानी सांगितले आहे की सर्व वस्तु व्यवस्था सुव्यवस्थित आहे. सर्व वस्तूंचे आपापले परिणमन नियत क्रमबद्ध होत आहे. आकस्मिक किंवा अक्रम अव्यवस्थित मागेपुढे असे काहीच घडत नाही.
११
जीव अज्ञान भ्रमाने स्वतःचे किंवा दुसऱ्या वस्तूचे परिणमन आपल्या इच्छे प्रमाणे मागे पुढे व्हावे असा पुरुषार्थ प्रयत्न धडपड करू इच्छितो. यद्यपि वस्तु व वस्तुचे परिणमन नियत व्यवस्थित आहे तथापि ज्ञानी नियतिच्या आधीन होऊन प्रमादी स्वच्छंदी बनत नाही. ज्यावेळी जे कार्य घडते तोच त्याचा स्वकाल व ते ज्या कारणाने घडते तोच त्याचा पुरुषार्थ प्रत्येक कार्य आपल्या कारण सामग्रीचा यथायोग्य एकत्र समवाय झाला असताना होते अशा वस्तुव्यवस्था सुव्यवस्थित आहे.
रूपी अरुपी द्रव्यभेद
शब्दरूप रसस्पर्शगन्धात्यन्तव्युदासतः ।
पंच द्रव्याण्यरूपाणि रूपिणः पुद्गलाः पुनः ।। १६ ।।
Jain Education International
अर्थ - ज्या मध्ये शब्द वर्ण रस स्पर्श गंध या मूर्त गुणांचा अत्यंत अभाव आहे अशी धर्म अधर्म आकाश काल व जीव पांच द्रव्ये अरूपी अमूर्त आहेत. पुद्गल द्रव्य रूपी मूर्त आहे.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org