________________
तत्वार्थसार
जरी प्राथमिक अवस्थेत आवश्यक आहे तथापि तो पर्याय दृष्टिरूप विकल्प सोडून स्वभाव दृष्टिरूप निर्विकल्प अनुभूति झाल्याशिवाय मोक्षमार्गाचा प्रारंभच होत नाही मग मोक्षाची प्राप्ति ती कशी होणार ?
द्रव्य-गुण- पर्याय
गुणो द्रव्यविधानं स्यात् पर्यायो द्रव्यविक्रिया । द्रव्यं युतसिद्धं स्यात् समुदायस्तयो द्वयोः ॥ ९ ॥
अर्थ- जी शक्ति, प्रकृति, जो स्वभाव द्रव्याला सदा द्रव्यरूपाने कायम ठेवतो त्याला गुण म्हणतात. द्रव्याचे जे ( विकृति - विकार ) परिणमन त्याला पर्याय म्हणतात. गुण व पर्याय यांच्या अयुतसिद्ध समवाय तन्मय - तादात्म्य संबंधाला द्रव्य म्हणतात.
एक च सत् चे द्रव्य - गुण - पर्याय हे तीन अंशधर्म आहेत. १ द्रव्यसत्, २ गुणसत्, ३ पर्यायसत्. याप्रमाणे हे भिन्न भिन्न तीन सत् वेगळे नाहीत.
एकच सत् तीन अंशधर्मानी कथन केले जाते. कथंचित् भेदरूपाने एकाच सत् चे वर्णन केले जाते. १ सत् - द्रव्य, २ सत् गुण, ३ सत् पर्याय १ संपूर्ण सत् द्रव्य मुखाने द्रव्यरूप म्हटले जाते. २ संपूर्ण सत् गुणमुखाने गुणरूप म्हटले जाते. ३ संपूर्ण सत् पर्याय रूपाने पर्यायरूप म्हटले जाते.
गुण व पर्याय यांची एकार्थ वाचक नावे
सामान्यमन्वयोत्सर्गे शब्दाः स्युर्गुण वाचकाः । व्यतिरेको विशेषश्च भेदः पर्याय वाचकाः ॥ १० ॥
अर्थ - सामान्य, अन्वय, उत्सर्ग, शक्ति, स्वभाव, धर्म, स्वरूप, लक्षण, ही गुणाची एकार्थ वाचक नावे आहेत.
Jain Education International
व्यतिरेक विशेष, अपवाद, परिणमन, बहिस्तत्त्व, तावत्काळ धारण केलेले रूप स्वभाव विभाव अवस्था, स्वलक्षण, विलक्षण, परिणति, ही सर्व पर्यायाची एकार्थ वाचक नावे आहेत.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org