________________
तत्वार्थसार
वस्तूचा ध्रुवधर्म समुत्पाद - व्ययाभावो यो हि द्रव्यस्य दृश्यते । अनादिना स्वभावेन तद् ध्रौव्यं ब्रुवते जिनाः ॥ ८ ॥
अर्थ- द्रव्याचा पूर्वपर्यायरूपाने व्यय, नवीन पर्यायरूपाने उत्पाद होत असताना देखील दोन्ही अवस्थेमध्ये जो अन्वयरूप द्रव्यधर्म उत्पाद - व्यय न होता सदासर्वदा ध्रुवस्वभावरूपाने विद्यमान असतो त्याला सर्वज्ञ जिनदेवानी ध्रौव्य म्हटले आहे. धर्म - अधर्म आकाश व काल या द्रव्यांचे नेहमी शुद्ध परिणमनच होते. पुदगल द्रव्य व जीवद्रव्य अन्य द्रव्याच्या संयोगवश विभावरूप परिणमन होत असताना देखील वस्तूचा हा ध्रुवत्वधर्म सदा सत्रूप, एकरूप, ध्रुवरूप - शुद्धरूपच राहतो. पर्याय धर्मरूपाने जरी पुद्गल व जीव अशुद्ध अवस्था परिणमन करतात तथापि त्या अशुद्ध अवस्थेत देखील द्रव्याथिकनयाने द्रव्यधर्मरूपाने दोन्ही द्रव्य नित्य शुद्धच असतात. जीव कर्मसंयोगाने सहित असताना देखील किंवा रागपरिणामरूपाने परिणमन करीत असताना देखील जीवाचा शुद्धज्ञान स्वभाव ध्रुवरूपाने पूर्णज्ञान रूपाने सदा विद्यमान असतो. या ध्रुवस्वभावाच्या आश्रयानेच सरागी - अशुद्धजीव वीतरागी – शुद्ध पर्याय रूप परिणमन करू शकतो. ही स्वभाव दृष्टि - द्रव्यदृष्टि धारण न करता पर्याय दृष्टीने जर सराग अवस्थेत आत्म्याचा स्वभाव सराग - अशुद्ध मानला, वीतराग अवस्था प्राप्त झाल्यानंतर जर स्वभावाला वीतराग - शुद्ध मानले तर स्वभावदृष्टीच्या अभावी हा जीव केव्हाही वीतरागी शुद्ध होऊ शकत नाही. सराग अवस्थेत ही वीतराग - स्वभावाची अनुभूति - शुद्धसंवेदन नितांत आवश्यक आहे. त्याशिवाय पर्यायात शुद्ध - वीतराग होण्याचा दुसरा मार्ग नाही.
मी आज अशुद्ध आहे व पुढे शुद्ध व्हावयाचे आहे, किंवा शुद्ध होण्याची शक्ती - योग्यता आहे हा केवळ पर्यायदृष्टिरूप विकल्प
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org