________________
तत्वार्थसार
ज्या पर्यायाचा स्थितिकाल व पर्यायकाल भिन्न असतो त्यावेळी स्थितिकाळामध्ये स्थित्यंतर होऊन पर्यायकाल समान स्थिति काल बदलू शकतो पण पर्यायकालामध्ये परिवर्तन होत नाही. असा वस्तुस्वभाव आहे.
वस्तूचा व्ययधर्म
स्वजातेरविरोधेन द्रव्यस्य द्विविधस्य हि विगमः पूर्वभावस्य व्यय इत्यभिधीयते ॥ ७ ॥
अर्थ- चेतन अचेतन द्रव्य आपल्या द्रव्यधर्माला - गुणधर्माला न सोडता त्याच्या पूर्वपर्यायाचा प्रध्वंसरूप - अभाव होणे याला व्यय म्हणतात.
उत्पादाप्रमाणे हा व्ययधर्म देखील एकटा राहात नसून नवीन पर्यायाचा उत्पादस्वरूप व अन्वयरूप द्रव्यधर्माचे ध्रुवत्व सहित त्रिलक्षणस्वरूप असतो.
प्रत्येक द्रव्य सदा सर्वदा भावी भूत
पर्यायधर्माच्या समुदायाने सदा परिपूर्ण - अखंड - अभेद रूप असते. अनित्यवादी बौद्ध मतवादी या पूर्वोत्तर पर्यायाच्या परिवर्तनाला पूर्वपर्यायाचा व्यय नाश व नवीन पर्यायाचा उत्पाद या नावाने सकेत करतात.
Jain Education International
-
नित्यवादी सांख्यमतवादी यालाच आविर्भाव - तिरोभाव या नावाने संकेत करतात.
-
अनेकान्तवादी जैन शासनामध्ये यालाच 'भूत्वा भवन' रूपाने संकेत करतात. 'भूत्वा' शब्द हा व्यय किंवा तिरोभावाचा सूचक आहे.
4
'भवन' शब्द हा उत्पाद किंवा आविर्भाव यांचा सूचक आहे. भूत्वा - भवन हे दोन्ही शब्द वस्तूच्या ध्रुवत्व स्वभावाचे सूचक आहेत. ध्रुवत्वाशिवाय उत्पादव्यय होऊ शकत नाही. तसेच उत्पाद - व्ययाशिवाय वस्तु ध्रुव राहू शकत नाही. असा या परस्पर विरोधी धर्माचा अविरोध - अविनाभाव आहे हे अनेकान्त जैन शासनाने सिद्ध केले आहे.
For Private & Personal Use Only
-
www.jainelibrary.org