________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
दृष्टि ज्ञानी नोसिद्ध ३ परमात्मा सिद्ध अथवा १ ते १२ गुणस्थानवर्ती जीव असिद्ध, अरिहंत परमात्मा जीवन्मुक्त नोसिद्ध, "सिद्ध परमात्मा सिद्ध असे जीवाचे ३ प्रकार आहेत.
४) नारकी, तिर्यंच, मनुष्य- देव या चार गतीच्या अपेक्षेने जीवाचे ४ भेद आहेत.
१३९
५) १ औपशामिक भाव, २ क्षायिक भाव, ३ क्षायोपशमिक भाव, ४ औदयिक भाव ५ पारिणामिक भाव या अपेक्षेने जीव ५ प्रकारचे आहेत.
या
६) जीव एका भवातून दुसन्या भवात जाताना विग्रहगतीमध्ये आकाश प्रदेश श्रेणीने गमन करतो. पूर्व-पश्चिम दक्षिण-उत्तर- खालीवर या सहा दिशेने गमन करतो. आग्नेय - नैऋत्य- वायव्यप्र - ईशान्य. विदिशेने तिरपे गमन करीत नाही म्हणून जीव ६ प्रकारचा आहे. अथवा पृथ्वी-अप-तेज- वायु-वनस्पति पाच स्थावर काय व एक त्रसकाय या अपेक्षेने जीव ६ प्रकारचा आहे.
1
७) १ स्याद् अस्ति, २ स्याद् नास्ति ३ स्याद् अस्तिनास्ति, ४ स्यात् अवक्तव्य, ५ स्याद् अस्ति अवक्तव्य, ६ स्याद् नास्ति - अवक्तव्य, ७ स्याद् अस्ति नास्ति - अवक्तव्य या सप्तभंगीनय अपेक्षेने जीवाचे ७ भेद आहेत.
अथवा एकेंद्रियाचे सूक्ष्म बादर दोन भेद, विकलत्रयाने ३ भेद द्वींद्रिय त्रींद्रिय चतुरिंद्रिय, पंचेंद्रियाचे २ भेद संज्ञी - असंज्ञी या अपेक्षेने जीवाचे ७ भेद आहेत.
८) आठ कर्माचा नाश झाला असताना जीवाला स्वाभाविक आठ गुण प्राप्त होतात. १ अनंतज्ञान ( ज्ञानावरण कर्माच्या अभावात. ) २ अनंतदर्शन ( दर्शनावरण कर्माच्या अभावात ). ३ अनंतसुख ( मोहनीय कर्माच्या अभावात). ४ अनंतवीर्य ( अंतराय कर्माच्या अभावात ). ५ अव्याबाधत्व ( वेदनीय कर्माच्या अभावात ) ६ अवगाहनत्व ( आयु
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org