________________
तस्वार्थसार अधिकार २ रा
आहेत. पहिल्या प्रतरात सौधर्म - ऐशान यांचे विमान युगल आहे. त्याचे" वर सानत्कुमार - माहेन्द्र देवांचे विमान युगल आहे. त्याचेवर ब्रह्मब्रह्मोत्तर देवांचे विमान युगल आहे. त्याचेवर लांतव- कापिष्ट देवांचे विमान युगल आहे त्याचेवर शुक्र - महाशुक्र देवाचे विमान युगल आहे. त्याचेवर शतार - सहस्त्रार देवांचे विमान युगल आहे. त्याचेवर आनतप्राणतदेवांचे विमान युगल आहे. त्याचेवर आरण - अच्युत देवांचे विमान युगल आहे. त्याचेवर नव ग्रैवेयक देवांचे अधस्तन - मध्यतन - उपरितन असे तीन तीन विमानांचे तीन पटल आहेत. त्यानंतर नव अनुदिश विमानांचे चक्राकार विमान पटल आहे. त्यानंतर विजय वैजयंत- जयंत अपराजित- सर्वार्थसिद्धि देवांचे चार दिशेला चार व वर टोकदार एक असे छत्राकार विमान पंचकाचे अंतिम पटल आहे. या विमानामध्ये देव आपापल्या देवगति नामकर्माच्या उदयवश उत्पन्न होतात.
द्यति ( शरीरकांति ), लेश्या, परिणाम विशुद्धि, आयु, सुख, प्रभाव इंद्रियज्ञानाचे तथा अवधिज्ञानाचे विषय या अपेक्षेने वरील वरील देवामध्ये उत्तरोत्तर अधिक अधिक वृद्धि होत जाते. गमन, अभिमान, शरीराची उंची, परिग्रहाविषयी मूच्र्छा परिणाम हे उत्तरोत्तर कमी होत जातात.
संसारी जीव व सिद्ध जीवांचे क्षेत्र
इति संसारिणां क्षेत्रं सर्वलोकः प्रकीर्तितः ।
सिद्धानां तु पुनः क्षेत्रमूर्ध्वलोकान्त इष्यते ।। २३३ ।।
१३७
अर्थ - याप्रमाणे सर्व संसारी जीवांचे क्षेत्र अधोलोक - मध्यलोक, ऊर्ध्वलोक स्वरूप सर्व लोक आहे. सूक्ष्म एकेंद्रिय जीवानी हा लोक गचपच भरला आहे. लोकाकाशाच्या भोवती ३ वातवलय आहेत. १ घनवातवलय, २ घनोदधि वातवलय, ३ तनुत्रातवलय या तीन वातवलयाच्या वेगवान चक्राच्या आधारावर हा लोकाकाश प्रमाण पुद्गल महास्कंध अलोकाकाशाच्या बहु मध्यभागी अधर स्थित आहे. लोकाकाशाच्या चोहोबाजूनी अलोकाकाश अनंत अमर्याद निराकार स्थित आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org