________________
तत्वार्थसारआधिकार २ रा
अर्थ- धर्मानामक प्रथम नरकाच्या पहिल्या खर भागामध्ये व दुसन्या पंकभागामध्ये भवनवासी देवांची काही भवने आहेत. तेथे भवनवासी देव राहतात. रत्नप्रभानामक प्रथमनरकाचा मध्यभाग व उपरितन भागामध्ये व मध्यलोकाच्या असंख्यात द्वीप समुद्र भागामध्ये व्यंतर देवांचे आवास स्थान आहेत. तसेच पृथ्वीच्यावर अंतराळात आकाशाच्या नभो मंडळामध्ये ज्योतिष्क देवांची विमाने आहेत. तेथे त्यांचा निवास आहे. तिर्यक्लोकामध्ये नभो मंडळामध्ये सर्वत्र व्यापून तारांगणाची विमाने आहेत.
वैमानिक देवांचा निवास
ये तु वैमानिका देवा ऊर्ध्वलोके वसन्ति ते । उपर्युपरि तिष्ठत्सु विमान प्रतरेष्विह ।। २२५ ॥ अर्धभागे हि लोकस्य त्रिषष्ठिः प्रतराः स्मृताः । विमानरिन्द्रकर्युक्ताः श्रेणीबद्धैः प्रकीर्णकैः ।।२२६।। सौधर्मेंशानकल्पौ द्वौ तथा सानत्कुमारकः । माहेन्द्रश्च प्रसिद्धौ द्वौ ब्रह्म-ब्रह्मोत्तरावुभौ ।। २२७ ।। उभौ लान्तवकापिष्टौ शुक्र-शुक्रौ महस्विनौ । द्वौ शतार सहस्त्रारौ आनतप्राणतावुभौ ।। २२८ ॥ आरणाच्युत नामानौ द्वौ कल्पाश्चेति षोडश । प्रैवेयाणि नवातोऽतो नवानुदिशचक्रकं ॥ २२९ ।। विजयं वैजयन्तंच जयन्तमपराजितं । सर्वार्थसिद्धिरेतेषां पंचानां प्रतरोऽन्तिमः ॥ २३० ।। एषु वैमानिका देवा जायमानाः स्वकर्मभिः । द्युति-लेश्या-विशुध्द्यायुरिन्द्रियावधिगोचरैः ॥ २३१ ।। तथा सुख प्रभावाभ्यामुपर्युपरितोऽ धिकाः । होनास्तथैव ते मान-गाति देह परिग्रहैः ।। २३२ ॥
अर्थ- वैमानिकदेव ऊर्वलोकात राहतात. कल्पोपपन्न देवाचे १६ भेद आहेत. दोन दोन देवांच्या विमानाचे वरवर विमान प्रतर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org