________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
१३५
देवांचे इंद्रियजन्य वैषयिकसुख पूर्वे कायप्रवीचारा व्याप्यशानं सुराः स्मृताः । स्पर्श-रूप-ध्वनि स्वान्त प्रवीचारास्ततः परे । ततः परेऽप्रवीचाराः कामक्लेशाल्पावतः ॥२२१॥
अर्थ- भवनवासी, व्यंतर, ज्योतिष्क व सौधर्म ऐशान स्वर्गातील देव मनुष्याप्रमाणे देवीबरोबर शरीराने मैथुन सेवन करून कामसुख भोगतात. त्यानंतर सानत्कुमार माहेन्द्र स्वर्गातील देव केवळ स्पर्शसुख भोगतात. शरीराने मैथुन सेवन करीत नाहीत. ब्रह्म-ब्रह्मोत्तर-लांतवकापिष्ट स्वर्गातील देव केवळ देवीचे मुख पाहून काम सुख भोगतात. त्यानंतर शुक्र-महाशुक्र-शतार-सहस्रार स्वर्गातील देव केवळ देवींचा मधुर ध्वनि ऐकून संतुष्ट होतात. त्यानंतर आनत-प्राणत. आरण अच्युत स्वर्गातील देव केवळ देवीचे मनात चितवन करुन कामसुख भोगतात. पुढील कल्पातीत देव सर्व ब्रह्मचारी असतात. त्याना प्रवीवारकामसेवन करण्याची इच्छा नसते विरक्त असतात. कल्पातीत देवामध्ये देवींचा संसर्ग देखील नसतो. देवींचा जन्म केवळ सौधर्म ऐशान दोन स्वर्गापर्यंतच होतो वर होत नाही. वरील देव खाली येऊन आपापल्या देवींना वर घेऊन जातात. सोळाव्या स्वर्गापर्यंतच देवींचा सहवास असतो. कल्पातीत देवामध्ये काम भोगाची इच्छाच उत्पन्न होत नाही. सर्व ब्रह्मचारी असतात.
भवनत्रिक देवांचे निवासस्थान धर्मायाः प्रथमे भागे द्वितीयेऽपिच कानि चित । भवनानि प्रसिद्धानि वसन्त्येतेषु भावनाः ।।२२२।। रत्नप्रभाभुवो मध्ये तथोपरितलेऽपिच । विविधेष्वन्तष्वरेत्र व्यंतरा निवसन्ति ते ॥२२३॥ उपरिष्टान्महीभागात् पटलेषु नभोऽङगणे । तिर्यग्लोकं समासाद्य ज्योतिष्का निवसन्ति ते ॥२२४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org