________________
१३४
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
वैमानिक देवाचे भेद
कल्पोपपन्नास्तथा कल्पातीतास्ते वैमानिका द्विधा । इंद्राः सामानिकाश्चैव त्रास्त्रिशाश्च पार्षदाः ।।२१८॥ आत्मरक्षास्तथा लोकपालान्तक प्रकीर्णकाः । किल्बिषा आभियोग्याश्च भेदाः प्रतिनिकायकाः ॥२१९॥ त्रास्त्रिशस्तथा लोकपाल विरहिताः परे । व्यंतरज्योतिषामष्टौ भेदाः सन्तीति निश्चिताः ।।२२०॥
अर्थ- वैमानिक देवाचे २ भेद आहेत. १ कल्पोपपन्न २ कल्पातीत जेथे इंद्रादिक श्रेष्ठ-कनिष्ठ देवांची कल्पना असते. त्याना कल्पोपपन्न म्हणतात. जेथे इंद्रादिकांची कल्पना नसते. सर्व देव अहमिंद्र असतात त्यांना कल्पातीत म्हणतात. प्रत्येक निकाय भेदामध्ये हे इंद्रादिक देवांचे १० प्रकार असतात. व्यंतर व ज्योतिष्क देवामध्ये त्रायस्त्रिश व लोकपाल सोडून ८ प्रकार असतात.
१ इंद्र - सर्व देवांचा मुख्य - सर्व देव याची आज्ञा पाळतात.
२ सामानिक- जे इंद्रासारखे ऐश्वर्य युक्त असतात. इंद्राप्रमाणे आज्ञा देत नाहीत.
३ त्रायस्त्रिश- मंत्रीप्रमाणे जे इंद्राचा कार्यभार करतात. ४ पारिषद- जे इंद्रच्या सभेत बसू शकतात. ५ आत्मरक्ष- जे इंद्राचे अंगरक्षक असतात. ६ लोकपाल- जे पोलिसप्रमाणे इतर देवांचे रक्षण करतात. ७ अनीक- जे सैन्याप्रमाणे इंद्राची सेवा करतात. ८ प्रकीर्णक- जे इतर प्रजेप्रमाणे सर्वसामान्य देव असतात. ९ आभियोग्य- जे इंद्राच्या विमानाचे वाहक बनून सेवा करतात. १० किल्बिषिक- जे नीच देवाप्रमाणे सभेत वसण्यास लायक
नसतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org