________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
अर्थ- भवनवासीचे १० भेद आहेत.१ नागकुमार, २ असुरकुमार, ३ सुपर्णकुमार, ४ अग्निकुमार, ५ दिक्कुमार, ६ वातकुमार, ७ स्तनितकुमार, ८ उदधिकुमार, ९ द्वीपकुमार, १० विद्युत्कुमार.
व्यंतराचे ८ भेद
किन्नराः किंपुरुषाश्च गंधर्वाश्च महोरगाः । यक्ष-राक्षस-भूताश्च पिशाचा व्यंतराः स्मृताः ॥ २१६ ॥
अर्थ – व्यंतरदेव ८ प्रकारचे आहेत. १ किंनर, २ किंपुरुष, ३ गंधर्व, ४ महोरग, ५ यक्ष, ६ राक्षस, ७ भूत, ८ पिशाच्च.
ज्योतिष्क देवाचे ५ भेद
सूर्या चंद्रमसौ चैव ग्रह-नक्षत्र-तारकाः । ज्योतिष्काः पंचधा ज्ञेयास्ते चलाचलभेदतः ।। २१७ ॥
अर्थ – ज्योतिष्क देव ५ प्रकारचे आहेत. १ सूर्य, २ चंद्र, ३ ग्रह, ४ नक्षत्र, ५ तारका अडीत्र द्वीपातील ज्योतिष्क देव निरंतर मेरुपर्वताच्या भोवती फिरत राहतात. यांच्या गमनावरून दिवस रात्र घटिका मुहर्त या व्यवहार कालाची कल्पना लोकव्यवहारत प्रसिद्ध आहे. या ज्योतिष्क विमानांचे चार क्षेत्र भूमिपासून वर ७९० योजन उंच अंतराळ पासून ९०० योजन उंच पर्यंत एकूण ११० योजन अवगाह क्षेत्रात हे निरंतर गमनशील असतात. सर्वांचे खाली तारका गमन करतात. त्यानंतर १० योजन उच सूर्यविमान गमनशील आहे. त्यावर ८० योजन उंचीवर चंद्र विमान गतिशील आहे. त्याचेवर तीन योजन उंच नक्षत्र नमन करतात. त्यांचेवर ३ योजन उंच बुध ग्रह गमन करतो. त्याचेवर ३ योजन शुक्रग्रह गमन करतो त्याचेवर ३ योजन उंच गुरु ग्रह गमन करतो. त्याचेवर चार योजन उंच मंगळ ग्रह गमन करतो, त्याचेवर ४ योजन उंच शनिग्रह गमन करतो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org