________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
आहेत. १ म्लेच्छ खंडात उत्पन्न होणारे कर्मभूमिज म्लेच्छ. २ अन्तरर्दीपज म्लेच्छ. कर्मभूमिज म्लेच्छ शक - यवन - शबर-पुलिंद वगैरे. अन्तर्वीपा मध्ये जे उत्पन्न होतात. त्याना अंत:पज म्लेच्छ म्हणतात. लवणोदधि व कालोदधि समुद्राच्या दोन्ही भागात जे पर्वताचे अंतिम भाग आंत गेले आहेत त्याना अंतर्वीप म्हणतात. दोन्ही समुद्रात एकूण ९६ अंतर्वीप आहेत. त्या ठिकाणी जे म्लेच्छ मनुष्य राहतात त्याना अन्तर्वीपज मनुष्य म्हणतात. ते काही एक जंघावाले, कांही लांगूल (शेपटी) असणारे, काही दीर्घ कर्ण, काही शिंगे असणारे, काही अश्वमुखी, काही गोमुखी, काही गजमुखी काही कपि (वानर) मुखी, काही मत्स्यमुखी काही व्याघ्र मुखी, काही सिंहमुखी, काही श्व (कुत्रा) मुखी इत्यादि अनेक प्रकारचे म्लेच्छ आहेत.
देवांचे वर्णन भावन - व्यंतर ज्योतिर्वैमानिक विभेदतः । देवाश्चतुर्णिकायाः स्युर्नामकर्मविशेषतः ॥ २१३ ।।
अर्थ - देवाचे ४ भेद आहेत. १ भवनवासी, २ व्यंतर, ३ज्योतिष्क, ४ वैमानिक. देव गतिनामकर्माच्या विशेषतेमुळे देवाचे चार निकायसमूह प्रकार आहेत.
देवांचे अवांतरभेद दशधा भावना देवा अष्टधा व्यंतराः स्मताः । ज्योतिष्काः पंचधा ज्ञेयाः सर्वे वैमानिका द्विधा ।। २१४ ॥ अर्थ - भवनवासीचे १० भेद आहेत व्यंतरदेव ८ प्रकारचे आहेत. ज्योतिष्क देवांचे ५ प्रकार आहेत. वैमानिक देव २ प्रकारचे आहेत
भवनवासीचे १० भेद नागासुर सुपर्णाग्नि दिग्वातस्तनितोदधिः । द्वीप-विद्युत्कुमाराख्या दशधा भावनाः स्मृताः ॥२१५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org