________________
१३०
तत्वार्थसार अधिकार २ रा
हैमवत व हैरण्यवत क्षेत्रात- नेहमी जघन्य भोगभूमिची रचना असते. ( १ पल्य आयुष्य )
हरि व रम्यक क्षेत्रात- नेहमी मध्यम भोग भूमिची रचना असते. ( २ पल्य आयुष्य )
उत्तरकुरु व दक्षिणकुरु क्षेत्रात नेहमी उत्कृष्ट भोग भूमिची रचना असते. ( ३ पल्य आयुष्य )
तसेच भरत व ऐरावत क्षेत्रातील ५ म्लेच्छखंड व विजया पर्वत येथे नेहमी चतुर्थकालाच्या आदि अंताप्रमाणे परिवर्तन होत असते. भरत व ऐरावत क्षेत्रातील आर्यखंडातच उत्सर्पिणी अवसर्पिणी रूपाने षट्काल चक्र रूपाने क्रमाने वृद्धि व हास होत असतो.
धातकी खंड द्वीप व पुष्करार्ध द्वीप वर्णन जंबूद्वीपोक्त संख्याभ्यो वर्षा वर्षधरा अपि । द्विगुणा धातकीखंडे पुष्कराः च निश्चितः ॥ २०९।। पुष्कर द्वीप मध्यस्थो मानुषोत्तर पर्वतः । श्रूयते वलयाकारः तस्य प्रागेव मानुषाः ॥ २१० ॥ द्वीपे श्वर्धतृतीयेषु द्वयोश्चापि समुद्रयोः । निवासोऽत्र मनुष्याणामत एव नियम्यते ॥ २११ ॥
अर्थ- जंबूद्वीप वृत्ताकार गोल असून त्याच्या भोवती वलयाकार लवण समुद्र आहे. जंबूद्वीपाचा व्यास एक लाख योजन आहे. लवणसमुद्राचा सर्व ठिकाणी विस्तार दुष्पट दोन लाख योजन आहे. लवण समुद्राच्या भोवती वलयाकार धातकी खंड आहे. त्याचा सर्वत्र व्यास दुप्पट चार लाख योजन आहे. याचे पूर्वधातकी खंड व पश्चिमधातकीखंड दोन भाग आहेत. दोन्ही भागात जंबूद्वीपासारखी सात- सात क्षेत्र व त्याना विभागणारे सहा- सहा वर्षधर पर्वत आहेत. जंबूद्वीपामध्ये जला मध्यभागी १ मेरु पर्वत आहे. त्याप्रमाणे धातकी खंडाच्या पूर्व- पश्चिम दोन विभागातील
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org