SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 174
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ श ६ दुषमा - दुषमा काल - याचा काल २१००० वर्ष प्रमाण आहे. या कालाचे शेवटी मनुष्याचे आयुष्य १२ वर्ष प्रमाण असते. शरीराची उंची १ हात असते. मनुष्य मोठ्या कष्टाने आपले जीवन जगतात. शेवटी ४९ दिवस गारांचा वर्षाव होतो. उल्कापात होतात. अनेक जीवांची प्राण हानि होते. काही जोडपी ( स्त्री-पुरुष ) पर्वताच्या गुहेत - वृक्षाच्या ढोलीत लपून बसतात- स्वर्गातील इंद्र त्याना सुरक्षित ठेवतात. नंतर उत्सर्पिणी कालास सुरुवात होते. १२९ उत्सर्पिणी कालाचे ६ भेद आहेत - त्याचा काल १० कोडाकोडी - सागर प्रमाण असतो. १) दुषमा दुषमा, २) दुषमा, ३) दुषमा सुषमा, ४) सुषमा दुषमा, ५) सुषमा, ६) सुषमा सुषमा. ६) दुषमा - दुषमा काल २१ हजार वर्ष - ५) दुषमा काल २१ हजार वर्ष ४) दुषमा सुषमा काल १ कोडाकोडी सागरास ४२ हजार वर्ष कमी. या कालात चतुर्थकालाप्रमाणे २४ तीर्थंकर उत्पन्न होतात. मनुष्ये व्रत-संयम धारण करतात. धर्म प्रवृत्ती वाढत जाते. जीवास मोक्षाची प्राप्ति होऊ शकते. ३) सुषमा-दुषमा - काल २ कोडाकोडीसागर प्रमाण जघन्य भोग भूमि रचना. २) सुषमा - काल ३ कोडाकोडीसागर मध्यम भोगभूमि रचना १) सुषमा - सुषमा - काल ४ कोडाकोडी सागर उत्कृष्ट भोग भूमि रचना. या प्रमाणे भरत व एरावत क्षेत्रात पट्कालचक्र सतत सुरू असते विदेहक्षत्रात नेहमी चतुर्थकालाप्रमाणे रचना असते. तेथे ३२ विदेह क्षेत्रात निरंतर २० विमान तीर्थकर धर्म असतात तीर्थ प्रवृत्ति-दिव्य ध्वनी द्वारा धर्मोपदेश सतत चालू असतो. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy