________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
१२८
भोगभूमीची रचना असते. कल्पवृक्षाची रचना असल्यामुळे उपजीविके साठीकोणताच व्यापार करावा लागत नाही. भोग भोगण्यांतच सर्वजीवनसमाप्त होते.
३ सुषमा-दुषमा- याचा काल २ कोडाकोडीसागरप्रमाण या काळात जघन्य भोग भूमीची रचना असते. मनुष्यांचे आयुष्य १ पल्य प्रमाण असते. याकाळाचे शेवटी १४ मनु उत्पन्न होतात शेवटले मनु नाभिराज कुलंकर त्यांचे पासून पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांचा जन्म होतो. या काळाचे शेवटी कल्पवृक्षाचा लोप होतो. कर्म भूमीची रचना सुरू होते. उपजीविका करण्याची लोकांना विवंचना सुरू होते. लोक नाभिराजाकडे जातात. नाभिराज यांनी उपजीविकेसाठी १ असि (क्षत्रिय विद्या) २ मसी (लेखन कला) ३ कृषि शेतकीचा व्यापार) ४ शिल्प (घरे बांधणे, कापड विणणे, इ. कला) ५ सेवा (नौकरी चाकरी करणे) ६ वाणिज्य (धन-धान्यादि देवघेव व्यापार) ही ६ उपजीविकेचो आवश्यक कर्मे करण्याचा उपदेश दिला.
४ दुषमा सुषमा-- चतुर्थकाल १ कोडाकोडीसागराला ४२००० वर्षे कमी इतका आहे. या कालात २४ तीर्थंकर जन्मास येतात. या कालात व्रते धारण करणे. देवपूजा दान भक्ती इत्यादि तीर्थं धर्माची प्रवृत्ति चालू करतात म्हणून त्याना तीर्थकर ही संज्ञा दिली जाते.
या काळात मनुष्याचे आयुष्य सुरूवातीस १ कोटिपूर्व असते शरीराची उंची ५०० धनुष्य असते. (१ धनुष्य = ३ ३ हात) केवळ याच काळात मनुष्य संयम धारण करून मोक्षास जाऊ शकतात. धर्माची विशेष प्रभावना होते म्हणून यास धर्मयुग म्हणतात.
५ दुषमा-- पंचमकाळ २१००० वर्ष प्रमाण आहे. चतुर्थकाळात क्रमाक्रमाने मनुष्याचे आयुष्य व शरीराची उंची सुख-वैभव कमी कमी होत जाते. मनुष्याचे आयुष्य सरापरी १०० वर्ष प्रमाण असते शरीराची उंची सुरुवातीस ७ धनुष्य असते पुढे क्रमाने कमी होते. या काळात मनष्य व्रत-संयम धारण करतात. पण या काळात जीवाला मक्तीची प्राप्ती होत नाही.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org