________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
भरत व ऐरावत क्षेत्रात कालचक्र परिवर्तन
उत्सपिण्यवसर्पिण्यौ षट्समे वृद्धिहानिदे । भरतैरावतौ मुक्त्वा नान्यत्र भवतः क्वचित् ॥ २०८॥
अर्थ - भरत ऐरावत क्षेत्राला सोडून अन्य क्षेत्रामध्ये ६ उत्सर्पिणी व ६ अवसर्पिणी कालाच्या अपेक्षेने आयु, शरीर, उंची, सुख, वैभव, यामध्ये वृद्धी व हानि होत नाही.
१२७
भावार्थ - भरत व ऐरावत क्षेत्रामध्ये उत्सर्पिणी अवसर्पिणी कालाच्या अपेक्षेने मनुष्याचे आयुष्य, शरीर, उंची धनधान्यादि वैभवसुख यामध्ये वृद्धि हानि होत असते. इतर क्षेत्रात वृद्धि हानि होत नाही एक कल्पकाळ २० कोडाकोडी सागर प्रमाण आहे. त्याचे २ भेद आहेत. १ उत्सर्पिणो २ अवसर्पिणी प्रत्येक काळ १० कोडाकोडी सागर प्रमाण आहे. सध्या अवसर्पिणी कालावा पाचवा दुषमा काळ सुरु आहे. अवसर्पिणी कालाचे ६ भेद आहेण. १ सुषमा-सुषमा, २ सुषमा, ३ सुषमा - दुषमा, ४ दुषमा- सुषमा, ५ दुषमा, ६ दुषमा-दुषमा.
१ सुषमा - सुषमा ४ कोडाकोडी सागर काल असतो, मनुष्याचे आयुष्य ३ पल्य प्रमाण असते, या वेळी उत्कृष्ट भोग भूमीची रचना असते. उपजीविकेसाठी मनुष्याना काही व्यापार धंदा करावा लागत नाही. दहा प्रकारचे कल्पवृक्ष असतात. त्यापासून मनात इच्छा करताच सर्व भोग्य वस्तूची प्राप्ति होते. सर्व जीव अत्यंत सुखी असतात.
J
यथेच्छ भोग भोगण्यातच सर्व जीवन बरबाद होते. यावेळी व्रत-संयम घेण्याचे देखील परिणाम होत नाहीत. त्यामुळे या काळात कोणीच मोक्षाला जात नाहीत. भोगभूमीतील जीवांचे कषाय मद त्यामुळे तेथून ते नियमाने देवगतीत जातात.
असतात.
२ सुषमा काल - याचा काल ३ कोडीकोडीसागर प्रमाण आहे या काळात मनुष्याचे आयुष्य २ पत्यप्रमाण असते. या काळात मध्यम
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org