________________
तत्त्वार्थसार अधिकार २ स
१२५
४ कीति, ५ बुद्धी, ६ लक्ष्मी देवी आपल्या पारिषद् व सामानिक देवपरिवारासह राहतात. त्या देवींचे आयुष्य पल्य प्रमाण असते.
चौदा महानदी
गंगा सिंधू उभे रोहिद् रोहितास्ये तथैवच । ततो हरिद्धरिकान्ते च सीतासीतोदके तथा ।।२०२॥ स्तो नारीनरकान्ते च सुवर्णार्जुन कूलिके । रक्तारक्तोदके च स्तो द्वे द्वे क्षेत्रे च निम्नगे ।।२०३।। पूर्वसागर गामिन्यः पूर्वा नद्यो द्वयोर्द्वयोः । पश्चिमार्णवगामिन्यः पश्चिमास्तु तयोर्मताः ॥२०४॥ गंगासिंधू परिवारः सहस्राणि चतुर्दश ।
नदीनां द्विगुणास्तिस्रस्तिसृतोऽर्धार्धहापनं ॥२०५।।
अर्थ- जंबूद्वीपाच्या सात क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात दोन दोन महानद्या आहेत. १ गंगा, २ सिंधू, ३ रोहित, ४ रोहितास्पा' ५ हरित्, ६ हरिकान्ता, ७ सीता, ८ सीतोदा, ९ नारी, १० नरकान्ता, ११ सुवर्णकूला, १२ रूप्यकूला, १३ रक्ता, १४ रक्तोदा. या दोन दो! जोड नद्यापैकी पहिली पहिली नदी गंगा, रोहित, हरित्, सीता नारी, सुवर्णकूला, रक्ता या पूर्व दिशेला वाहात जाऊन लवण समुद्राच्या पूर्वभागाला जाऊन मिळतात. बाकीच्या दुस-या दुस-या नद्या सिंधू, रोहितास्या, हरिकान्ता, सीतोदा, रकान्ता, रूप्यकूला रक्तोदा या नद्या पश्चिम दिशेगा वाहात जाऊन लवण समुद्राच्या पश्चिम भागास जाऊन मिळतात. या महानद्यांना येऊन मिळणा-या लहान क्षुद्रनद्यांचा परिवार क्रमाने दुप्पट दुप्पट होत जाऊन पुढे क्रमाने निम्पट होत जातो.
१ गंगा- सिंधू - १४ हजार नद्या परिवार. २ रोहित- रोहितास्या- २८ हजार नद्या परिवार ३ रित्- हरिकान्ता- ५६ हजार नद्या परिवार ४ सीता- सीतोदा- ११२ हजार नद्या परिवार
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org