________________
१२४
तस्वार्थसार अधिकार २ रा
पर्वतावर ६ सरोवरवर्णन
पद्मस्तथा महापद्मस्तिगिछ: केसरी तथा । पुंडरीको महान् क्षुद्रो न्हदा वर्षधराद्रिषु ॥ १९७ ॥
अर्थ - त्या सहा वर्षधर पर्वतावर क्रमाने पद्म, महापद्म, तिगिछ केसरी, पुंडरीक, महापुंडरीक नामक ६ सरोवरे आहेत.
सरोवरांची क्षेत्रमर्यादा
सहप्रयोजनायाम आद्यस्तस्यार्धविस्तरः ।
द्वितीयो द्विगुणस्तस्मात् तृतीयो द्विगुणस्ततः ॥ १९८ ॥
उत्तरा दक्षिणैस्तुल्या निम्नास्ते दशयोजनों । प्रथमे परिमापेन योजनं पुष्करं हदे ॥ १९९ ॥ द्विचतुर्योजनं ज्ञेयं तद् द्वितीयतृतीययोः । अपाच्यवदुदीच्यानां पुष्कराणां प्रमाश्रिताः ॥ २०० ॥
अर्थ- सहा सरोवरापैकी पहिले सरोवर १००० योजन आयाम ( लांब ) व ५०० योजन रुंद विस्ताराचे आहे. पहिल्या सरोवराची खोली १० गोजन आहे. दुसरे व तिसरे सरोवराची लांबी रुंदी खोली दुप्पट दुप्पट विस्तार आहे. मेरुपर्वताच्या उत्तरेकडील पर्यंत सरोवरांचा विस्तार दक्षिणेकडील पर्वत सरोवराच्या विस्तार प्रमाण आहे.
प्रथम सरोवरात एक योजन विस्ताराचे पुष्कर नामक कमळ आहे दुसऱ्या सरोवरातील कमळ दोन योजन विस्ताराचे व तिसन्या सरोवरातील कमळ चार योजन विस्ताराचे आहे. पुढील उत्तरेकडील सरोवरातील कमलांचा विस्तार दक्षिणेकडील कमलांच्या विस्ताराप्रमाणेआहे.
सरोवरातील कमलावर देवींचे निवासस्थान
श्रीश्च हीश्च धृतिः कीर्तिर्बुद्धिर्लक्ष्मीश्च देवताः । पत्योपमायुषस्तेषु परिषद् सामानिकान्विताः ॥२०१॥ अर्थ- सहा पर्वताच्या ६ सरोवरातील एक एक सरोवरातील कमलावर क्रमाने ६ देवींचे निवासस्थान आहे. १ श्री २ ही ३ धृति
Jain Education International
--
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org