________________
११८
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
देवगतीतून येणारे जीव कोठे उत्पन्न होतात
भाज्या एकेंद्रियत्वेन देवा ऐशानतश्च्युताः । तिर्यक्त्त्व मानुष्यत्वाभ्या मासहस्रा रतः पुनः ॥ १६९ ॥ ततः परं तु ये देवास्ते सर्वेऽनन्तरे भवे । उत्पद्यन्ते मनुष्येषु न हि तिर्यक्षु जातुचित् ।। १७० ।।
शलाका-पुरुषा न स्युभौंमज्योतिष्क भावनाः । अनन्तर भवे तेषां भाज्या भवति निर्वृतिः ॥ १७१ ॥ ततः परं विकल्प्यन्ते यावद्ग्रैवेयकं सुराः । शलाकापुरुषत्वेन निर्वाणगमनेन च ।। १७२ ॥ तीर्थेश - राम-चत्रित्वे निर्वाणगमनेन च । च्युताः सन्तो विकल्प्यन्तेऽनुदिशानुत्तरामरा: ।। १७३ ।। भाज्या स्तीर्थेश चक्रित्वे युताः सर्वार्थ सिद्धितः । विकल्या रामभावेपि सिध्यन्ति नियमात् पुनः ।। १७४ ॥ दक्षिणेन्द्रास्तथा लोकपाला लौकान्तिका शची । शक्रश्च नियमाच्च्युत्वा सर्वे ते यान्ति निर्वृति ।। १७५ ।।
अर्थ - भवनवासी - व्यंतर ज्योतिष्क व ऐशान स्वर्गापर्यंतने देव एकेंद्रिया पर्यंत उत्पन्न होऊ शकतात. सहस्रारस्वर्गापर्यंतचे देव तिर्यंच व मनुष्य होऊ शकतात. सहस्रार स्वर्गानंतरच्या पुढील स्वर्गातील देव हे केवळ मनुष्य गतीतच उत्पन्न होतात. तिर्यंच गतीत उत्पन्न होत नाहीत. भवनवासी- वानव्यंतर ज्योतिष्क देव हे मरून शलाका पुरुष होत नाहीत. परंतु तेथून येणारे जीव मनुष्यगतीत उत्पन्नहं ऊन निर्वाणाला जाऊ शकतात. सौधर्म ऐशान स्वर्गापासून ग्रैवेयक विमानवासीपर्यंतचे देव मरून शलाका पुरुष होऊ शकतात. व निर्वाणाला देखील जाऊ शकतात. नवअनुदिश व पाच पंचोत्तर विमानवासी देव तेथून च्युत होऊन तीर्थंकर-वलदेवचक्रवर्ती होऊ शकतात. मोक्षाला देखील जाऊ शकतात. सर्वार्थसिद्धि विमानातून येणारे जीव अनन्तर भवात तीर्थंकर - बलभद्र चक्रवर्ती होऊ शकतात. नियमाने मोक्षास जातात. एक भवात्रतारी असतात. त्याना अनन्तर मनुष्यभव धारण केल्यानंतर पुनः दुसरा भव धारण करावा लागत
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org