________________
११४
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
कोणता जीव कोणत्या नरकापर्यंत जातो धर्मामसंज्ञिनो यान्ति वंशान्तश्च सरीसृपाः । मेघान्ताश्च विहंगाश्च अंजनांन्ताश्च भोगिनः ॥ १४६ ॥ तामरिष्टांच सिंहास्तु मघव्यन्ताश्च योषितः ।
नरा मत्स्याश्च गच्छन्ति माघव्यंताश्च पापिनः ।। १४७ ।।
अर्थ - एकेंद्रियापासून असंज्ञीपंचेंद्रियापर्यंतचे मनरहित असंज्ञीजीव पापकर्मामुळे धर्मा नामक पहिल्या नरकापर्यंत जातात. त्याचे खाली जात नाहीत. सरीसृप - पाय नसलेले पोटाने घसरणारे अजगर वगैरे जीव पापकर्म केल्यामुळे वंशानामक दुसन्या नरकापर्यंत जातात. नभचर पक्षी पापकर्मामुळे मेघानामक तिसन्या नरकापर्यंत जातात. सापासारख विषारी प्राणी पापकर्मामुळे अंजना नामक चवथ्या नरकापर्यंत जातात. सिंहानगर क्रूर प्राणी पापकर्मामुळे अरिष्टा नामक पाचव्या नरकापर्यंत जातात. मानवापैकी स्त्री मानव पापकर्मामुळे मधवी नामक सहाव्या नरकापर्यंत जातात- खाली सातव्या नरकात जात नाहीत. पुरुषमानव व मत्स्यापैकी तंदुल मत्स्य पापकर्मामुळे मात्रवी नामक सातव्या नरकापर्यंत जातात.
कोणत्या नरकातून जीव कोठे उत्पन्न होतो. न लभन्ते मनुष्यत्वं सप्तम्या निर्गता क्षितेः । तिर्यक्त्वे च समुत्पद्य नरकं यान्ति ते पुनः ॥ १४८ ॥
मधव्या मनुष्यलाभेन षष्ठ्या भूमविनिर्गताः । संयमं तु पुनः पुण्यं नाप्नुत्रन्तीति निश्चयः ॥ १४९ ॥ निर्गताः खलु पंचम्या लभन्ते केचन व्रतं । प्रयान्ति न पुनर्मुक्ति भावसंक्लेशयोगतः । १५० ।। लभन्ते निर्वृति केचित् चतुर्थ्या निर्गताः क्षितेः । न पुनः प्राप्नुवन्त्येव पवित्रां तीर्थकर्तृतां ।। १५१ ॥
लभन्ते तीर्थकर्तृत्वं ततोऽन्याभ्यो विनिर्गताः । निर्गत्य नरकान्न स्युर्बलकेशव चत्रिणः ।। १५२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org