________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
११३
११३
तिर्यंचजीवांची उत्कृष्ट उंची योजनानां सहस्रं तु सातिरेकं प्रकर्षतः । एकेंद्रियस्य देहः स्याद् विज्ञेयः स च पद्मनि ।। १४३ ॥ त्रिकोशः कथितः कुंभी शंखो द्वादशयोजनः।
सहस्र योजनो मत्स्यो मधुपश्चैक योजनः ॥ १४४ ॥
अर्थ- एकेंद्रियाच्या शरीराची उंची उत्कृष्टपणे एक हजार योजन कांही अधिक आहे. ही उत्कृष्ट शरीर अवगाहना कमलाची असते. त्रींद्रिय जीव कुंभी-मुंगी- मुंगळा यांची अवगाहना तीन कोस प्रमाण असते. चतुरिद्रिय भ्रमराची अवगाहना चार कोस- एक योजनप्रमाण असते. पंचेंद्रिय जीव महामस्त्य यांची अवगाहना एक हजार योजन विस्तार असते. हे उत्कृष्ट अवगाहना धारण करणारे जीव शेवटच्या स्वयंभूरमण द्वीपातील स्वयंप्रभ पर्वताच्या पलिकडच्या भागातील जीवांची असते. उत्कृष्ट अवगाहना धारण करणारा महामत्स्य हा स्वयंभूरमण समुद्रात असतो.
तिर्यंच जीवाची जघन्य अवगाहना असंख्य ततमो भागो याबानस्त्यंगुलस्य तु । एकाक्षादिषु सर्वेषु देहस्तावात् जघन्यतः ॥ १४५ ।।
अर्थ- एकेंद्रियादि सर्व तिर्यंच जीवांची जघन्य अवगाहना सामान्यपणे घनांगुलाच्या असंख्यातवाभाग प्रमाण सूक्ष्म असते. सूक्ष्म निगोदिया लब्ध्य पर्याप्तक एकेंद्रियजीवाची अवगाहना उत्पत्तीच्या तिसऱ्या समयात सर्वांत सुक्ष्म घनांगलाच्या असंख्यातवाभाग प्रमाण असते. द्वींद्रिय जीवाची अनंधरी ( आळी ) ची जघन्य अवगाहना असते त्रींद्रीय जीवाची कुंथु नामक सूक्ष्म मुंगीची जघन्य अवगाहना असते. चतुरिंद्रिय जीवाची काण मक्षिकाची जघन्य अवगाहना असते. पंचेंद्रिय जीवाची महामत्स्याच्या कानामध्ये असणाऱ्या तंदुल मत्स्याची जघन्य अवगाहना असते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org