________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
१११
ज्यांचा मरण पर्याय काल व आयु स्थितिकाल एक असतो त्यांना अपमृत्यु होत नाही. आयुस्थिती काल जास्त व मरण पर्याय काल कमी असतो त्याना विष-वेदना रक्तक्षय-शस्त्राघात- संक्लेश श्वास निरोध इत्यादि दुर्घटनारूप निमित्त प्राप्त होऊन मरण येते त्यास अपमृत्यु म्हणतात. प्रत्येक द्रव्याचे पर्याय परिणमन जन्म-मरण हे सर्व नियत क्रमबद्ध आपल्या स्वकालीन होते. ज्याचा स्थितिकाल जास्त व पर्यायकाल कमी असतो त्यावेळी एखादे बाह्य निमित्त मिळते- अघटित घटना घडते व मरण येते, आपण प्रयत्न करूनही जेव्हा प्रयत्न सफल होत नाही तेव्हा शेवटी म्हणतो की त्याचा मरण काल आला होता त्यामुळे मेला. लोकव्यवहार भाषेत तो अपमृत्यु म्हटला जातो. शास्त्रीय भाषेत जन्म किंवा मरण हे आपल्या नियतक्रमबद्ध पर्याय काली होते असे म्हटले जाते.
नारको जीवांची शरीराची उंची घम्मायां सप्त चापानि सपादं च करत्रयं ।
उत्सेधः स्यात् ततोऽन्यासु द्विगुणो द्विगुणो हि सः ।। १३६ ।।
अर्थ- घर्मा नामक प्रथम नरकातील जीवाच्या शरीराची उंची सात धनुष्य ( ३॥ हात=१ धनुष्य ) व ३। हात अधिक अर्थात् २७।।। हात असते त्याच्या खालच्या खालच्या पृथ्वीतील नारकी जीवांची उंची दुप्पट दुप्पट होत जाते. सातव्या नरकातील जीवांची उंची पाचशे ५०० धनुष्य असते.
मनुष्याची शरीराची उंची शतानि पंच चापानां पंचविंशतिरेव च । प्रकर्षेण मनुष्याणामुत्सेधः कर्मभूमिषु ॥ १३७ ।। एक: क्रोशो जघन्यासु द्वौ कोशौ मध्यमासु च ।
क्रोशत्रयं प्रकृष्टासु भोगभूषु समुन्नतिः ।। १३८॥
अर्थ- कर्मभूमितील मनुष्यांच्या शरीराची उंची (उत्कृष्टपणे) (५२५) पाचशे पंचवीस धनुष्य असते. जघन्यभोगभूमितीलजी वांची उंची
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org