________________
तस्वार्थसार अधिकार २ रा
१३-१४ आनत - प्राणत स्वर्गातील देवांचे वीस सागर १५-१६ आरण- अच्युत स्वर्गातील देवांचे बावीस सागर उत्कृष्ट
११०
आयुष्य आहे
नवग्रैवेयक स्वर्गातील देवाचे आयुष्य क्रमाने एक-एक सागर अधिक २३ ते ३१ सागर प्रमाण उत्कृष्ट आयुष्य आहे.
नव अनुदिश विमानातील देवांचे आयुष्य ३२ सागर प्रमाण पाच पंचोत्तर देवांचे उत्कृष्ट आयुष्य ३३ सागर प्रमाण आहे. सौधर्मे ऐशान स्वर्गांतील देवांचे जघन्य आयुष्य १ पल्य काही अधिक सानत्कुमार- महेंद्र स्वर्गातील देवांचे जघन्य आयुष्य ब्रह्म ब्रह्मोत्तर स्वर्गातील देवांचे जे उत्कृष्ट आयुष्य तत् प्रमाण समजावे.
याप्रमाणे वरील वरील स्वर्गातील देवांचे उत्कृष्ट आयुष्य ते खालच्या स्वर्गातील देवांचे जघन्य आयुष्य समजावे सर्वार्थसिद्धी देवांचे जे उत्कृष्ट-आयुष्य ३३ सागर तेच त्यांचे जघन्य आयुष्य समजावे - त्यांचेमध्ये उत्कृष्ट जघन्य हा भेद नाही.
--
तियंच मनुध्याचे जघन्य आयुष्य
अन्यत्रानपमृत्युभ्यः सर्वेषामपि देहिनां । अन्तर्मुहूर्तमित्येषां जघन्येनायुरिष्यते ॥ १३४ ॥
अर्थ- ज्यांचा अपमृत्यु - अकाल मरण होत नाही असे तिच मनुष्य सोडून बाकी सर्व तिर्यंच- मनुष्यांचे जघन्य आयुष्य अन्तर्मुहूर्त आहे.
अपमृत्यु कोणास होत नाही
असंख्येयमायुष्काश्चरमोत्तममूर्तयः ।
देवाश्च नारकाश्चैषामपमृत्युनं विद्यते ।। १३५ ॥
अर्थ- ज्याचे असंख्यात वर्ष प्रमाण ( तीन पत्य- दोन पल्यएक पल्य ) आयुष्य आहे असे भोगभूमीतील जीव, चरम शरीर व उत्तम शरीर धारण करणारे- कांही पुण्यवान जीव मनुष्य, देव व नारकी जीव याना अपमृत्यु होत नाही.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org