________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
१०९
विशपार्थ- चंद्राचे आयुष्य एक लाख वर्ष अधिक एक पल्य.
सूर्याचे आयुष्य एक हजार वर्ष अधिक एक पल्य, शुक्र ग्रहाचे आयुष्य शंभर वर्ष अधिक एक पल्य. बृहस्पति (गुरु)चे आयुष्य पूर्ण एक पल्य वाकीच्या ग्रहांचे व नक्षत्रांचे आयुष्य अर्धा पल्य तारांकाचे आयुष्य / पल्य प्रमाण आहे.
___ वैमानिक देवांचे आयुष्य द्वयो ह्रयो रुभौ सप्त दश चैव चतुर्दश । षोडशाष्टादशाप्यते सातिरेकाः पयोधयः ॥ १२९ ॥ समुद्रा विशतिश्चैव तेषां द्वाविंशति स्तथा । सौधर्मादिषु देवानां भवत्यायु : प्रकर्षत ः ॥ १३० ॥ एकैकं वर्धयेब्धि नवग्रैवेयकेष्वतः । नवस्वनुदिशेषु स्यात् द्वात्रिंशदविशेषतः ।। १३१ ।। त्रयस्त्रिशत् समुद्राणां विजयादिषु पंचसु । साधिकं पल्यमायुः स्यात् सौधर्मेशानयोर्द्वयोः ॥ १३२॥ परतः परतः पूर्व शेषेषु च जघन्यतः ।
आयुः सर्वार्थसिद्धौ तु जघन्यं नैव विद्यते ।। १३३ ॥ अर्थ- वैमानिक देवांचे आयुष्य - १-२ सौधर्म- ऐशान स्वर्गातील देवांचे दोन सागर कांही अधिक ३-४ सानत्कुमार-महेद्र स्वर्गातील देवांचे सात सागर कांही अधिक ५-६ ब्रम्ह ब्रम्होत्तर स्वर्गातील देवांचे दहा सागर कांही अधिक ७-८ लांतव-कापिप्ट स्वर्गातील देवांचे चौदा सागर कांही अधिक ९-१० शुक्र महाशुक्र स्वर्गातील देवांचे सोळा सागर कांही अधिक ११-१२ शतार-सहस्रार स्वर्गातील देवांचे अठरासागर कांही अधिक
१ टीप- ज्यानी प्रथम वरच्या स्वर्गातील देवांचे आयुस्थितिचा बंध बांधला आहे पण पुढे संक्लेश परिणामाने मरताना जे खालच्या स्वर्गात जन्म घेतात त्याना घातायष्क देव म्हणतात. त्यांचे आयुष्य काही अधिक असते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org