________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
अर्थ - नरकभूमिचे ७ भेद आहेत. १ घर्मा, २ वंशा, ३ मेघा, ४ अंजना, ५ अरिष्टा, ६ मघवी, ७ माघवी. यातील जीवांचे उत्कृष्ट आयुष्य क्रमाने एक सागर, तीन सागर, सात सागर, दहा सागर, सतरा सागर, बावीस सागर, तेहतीस सागर आहे. घर्मा पृथ्वीतील जीवांचे जघन्य आयुष्य दहा हजार वर्ष आहे. वंशा आदि पृथ्वीतील जीवांचे जघन्य आयुष्य क्रमाने एक सागर, तीन सागर, सात सागर दहा सागर सतरा सागर, बावीस सागर प्रमाण आहे. वरच्या पृथ्वीतील नारकी जीवांचे जे उत्कृष्ट आयुष्य ते खालच्या पृथ्वीतील नारकी जीवांचे जघन्य आयुष्य समजावे.
१०८
भवनवासी देवांचे आयुष्य
भावनानां भवत्यायुः प्रकृष्टं सागरोपमं । दशवर्षसहस्रं तु जघन्यं परिभाषितं ।। १२६ ।।
अर्थ - भवनवासी देवांचे उत्कृष्ट आयुष्य १ सागर प्रमाण आहे जघन्य आयुष्य दहा हजार वर्ष आहे.
व्यंतरदेवांचे आयुष्य
पल्योपम भवत्यायु: सातिरेकं प्रकर्षतः ।
दशवर्षसहस्रं तु व्यंतराणां जघन्यतः ।। १२७ ॥
अर्थ- व्यंतर देवांचे उत्कृष्ट आयुष्य कांही अधिक १ पल्य प्रमाण आहे. जघन्य आयुष्य दहा हजार वर्ष प्रमाण आहे.
ज्योतिष्क देवांचे आयुष्य
पस्योपमं भवत्यायुः सातिरेकं प्रकर्षतः ।
पल्योमाष्टभ । गेषु ज्योतिष्काणां जघन्यतः ।। १२८ ।।
अर्थ - ज्योतिष्क देवांचे उत्कृष्ट आयुष्य साधिक १ पल्य प्रमाण आहे जघन्य आयुष्य ? पत्यप्रमाण आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org