________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
नवायु परिसर्पाणां पूर्वागानि प्रकर्षतः । वयक्षाणां द्वादशाद्वानि जीवितं स्यात् प्रकर्षतः ।। १२० ।। असंज्ञिनस्तथा मत्स्याः कर्मभूजाश्चतुष्पदाः । मनुष्याश्चैव जीवन्ति पूर्वकोटि प्रकर्षतः ।। १२१ ॥
एकं द्वे त्रीणि पत्यानि नृ-तिरश्चां यथाक्रमं ।
जघन्य मध्यमोत्कृष्ट भोगभूमिषु जीवितं ॥
कुभोग भूमिजानां तु पत्यमेकं तु जीवितं ( षट्पदं ) ॥ १२२ ॥
अर्थ - पृथ्वीकायिक जीवांचे उत्कृष्ट आयुष्य बावीस हजार वर्ष जलकायिक जीवांचे सात हजार वर्ष, वनस्पतीकायिक जीवांचे दहा हजार वर्ष वायुकायिक जं वांचे तीन हजार वर्ष, पक्ष्यांचे बाहत्तर हजार वर्ष, सर्पाचे बेचाळीस हजार वर्ष उत्कृष्ट आयुष्य आहे.
तीन इंद्रियजीवांचे उत्कृष्ट आयुष्य एकोनपन्नास दिवस आहे. अग्निकायिक जीवांचे तीन दिवस चतुरिद्रिय जीवांचे सहा महिने, सरीसृप ( अजगर वगैरे) यांचे आयुष्य नऊ पूर्वांग वर्ष, द्वींद्रिय जीवांचे बारा वर्ष, असंज्ञी पंचेंद्रिय तिर्यच, मच्छ (मासे) कर्मभूमिज चतुष्पाद गाय-बैल वगैरे संज्ञीपंचेंद्रिय तिर्यंच, व मनुष्य यांचे उत्कृष्ट आयुष्य एक कोटि पूर्ववर्ष असते.
१०७
जघन्य भोगभूमि जीवांचे १ पल्य, मध्यम भोगभूमि जीवांचे २ पल्य, उत्कृष्ट भोगभूमि जीवांचे ३ पल्य उत्कृष्ट आयुष्य असते. कुभोगभूमि जीवांचे १ पल्य उत्कृष्ट आयुष्य असते.
नारको जीवांचे आयुष्य
एकं त्रीणि तथा सप्त दश सप्तदशेतिच |
द्वाविंशति स्त्रयस्त्रिशद् धर्मादिषु यथाक्रमं ॥ १२३ ॥
स्यात् सागरोपमाण्यायुर्नरकाणां प्रकर्षतः ।
दशवर्षाणि धर्मायां पृथिव्यां तु जघन्यतः || १२४ ।। वंशादिषु तु तान्येकं त्रीणि सप्त तथा दश । तथा सप्तदश द्वयग्रा विंशतिश्च यथोत्तरं ।। १२५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org