________________
१००
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
अनाहारक जीव कोणते आहेत ?
अस्त्यनाहारकोऽयोगः समुद्घातगतः परः । सासनो विग्रहगतौ मिथ्यादृष्टि स्तथाऽव्रतः । ९५ ।।
अर्थ - अयोग केवली ( गुण. १४ ), समुद्घातगत केवली ( गुण. १३ ) तथा विग्रहगतिमध्ये असणारे सासादन, मिथ्यादृष्टि, व असंयत सम्यग्दृष्टि हे अनाहारक आहेत. याशिवाय बाकीचे १ ते १३ गुणस्थानवर्ती जीव आहारक आहेत. मरताना जीवाचे १ ले, २ रे, ४ थे
हे तीनच गुणस्थान असतात म्हणून मरणानंतर विग्रहगतीतील
मिथ्यादृष्टि सासादन व अविरत सम्यग्दृष्टि हे जीव अनाहारक
असतात.
विग्रहगति वर्णन
विग्रहो हि शरीरं स्यात् तदर्थं या गतिर्भवेत् । विशीर्णपूर्वदेहस्य सा विग्रहगतिः स्मृता ॥ ९६ ॥
अर्थ - विग्रह म्हणजे शरीर ज्याने मरणानंतर पूर्व शरीर सोडले आहे अशा जीवाची नवीन शरीर धारण करण्यासाठी जे गमन ती विग्रहगति होय.
विग्रहगतीत कोणता योग असतो ?
जीवस्य विग्रहगतौ कर्मयोगं जिनेश्वराः । प्राहुर्देशान्तरप्राप्तिकर्मग्रहण कारणं ।। ९७ ।।
अर्थ - विग्रह गतीमध्ये जीवाला कार्माणकाययोग असतो हा कार्माणकाययोग एक भवातून दुसन्या भवात जाण्यास कारणीभूत होतो. या कामणिकाययोगाने जीवाला कर्मबंध होतो परंतु येथे विग्रहगतीमध्ये असणारे कार्माण शरीर औदारिक- वैक्रियिक शरीराच्या अभावात इंद्रियांचा अभाव असल्यामुळे इंद्रियद्वारे विषयाचा उपभोग घेऊ शकत नाही म्हणून ते कार्माण शरीर निरूपभोग-उपभोग रहित असते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org