SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 143
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सत्त्वार्थसार अधिकार २ रा १) औपशमिकसम्यक्त्व- दर्शन मोहाच्या तीन प्रकृति मिथ्यात्व सम्यग्मिथ्यात्व, सम्यक्प्रकृति व अनंतानुबंधी चार प्रकृति या ७ प्रकृतीचा उपशम झाला असताना जे समीचीन तत्वश्रद्धान होते त्यास औपशामिक सम्यग्दर्शन म्हणतात (गुण. ४ ते ११) क्षायिक सम्यक्त्व- उपरोक्त ७ प्रकृतीचा क्षय झाला असताना जे समीचीन तत्वश्रद्धान होते त्यास क्षायिकसम्यग्दर्शन म्हणतात, (गुण. ४ ते १४) क्षायोपशामिक सम्यक्त्व- दर्शन मोहाच्या २ प्रकृति. मिथ्यात्व सम्यग्मिथ्यात्व व अनंतानुबंधी ४ प्रकृति यांचा वर्तमान निषेकाचा उदयाभावी क्षय व पुढे उदयास येणा-या निषेकाचा सद्वस्थारूप उपशम व सम्यकप्रकृतिचा उदय असताना जे समीचीन तत्वश्रद्धान होते परंतु त्यामध्ये चल-मलीन अगाढ दोष उत्पन्न होतात त्यास क्षायोपशामिक सम्यक्त्व म्हणतात (गण. ४ ते ७) ४) सासदन सम्यक्त्व- जव्हा सम्यग्दृष्टी जीव अनंतानुबंधीच्या उदयाने सम्यक्त्वापासून भ्रष्ट होतो परंतु अद्यापि मिथ्यात्वाप्रत पोहोचत नाही अशा मधल्या परिणामास सासादनसम्यक्त्व म्हणतात. (गुण. २) ५) सम्यग्मिथ्यात्व- सम्यग्मिथ्यात्वदर्शन मोहाचा उदय असताना जीवाचे जे मिश्र परिणाम होतात त्यांना शुद्ध सम्यक्त्वरूप म्हणता येत नाही व शुद्ध मिथ्यात्वरूप म्हणता येत नाही अशा मिश्र परिणामास सम्यग्मिथ्यात्व म्हणतात. (गुण. ३) ६)मिथ्यात्व- मिथ्यात्व कर्माच्या उदयाने जीवाचे अतत्वश्रद्धानरूप विपरीतश्रद्धान परिणाम होतात त्यास मिथ्यात्व म्हणतात. (गुण १) सम्यक्त्व घातक दर्शनमोह व अनंतानुबंधी यांच्या सद्भावात व अभावात जीवाचे जे परिणाम होतात त्या अपेक्षेने सम्यक्त्व मार्गणेचे ६ भेद केले आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy