________________
९६
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
मरणं पत्थेइ रणे, देइ सुबहुगं वि थूयमाणो दु । ण गणइ कज्जाकज्जं लक्खणमेयं तु काउस्स ॥
जो रोष करतो, 'दुसऱ्याची निंदा करतो, दुसन्यास दोष लावतो, तीव्रशोक, तीव्र भय धारण करतो, मत्सर करतो. दुसऱ्याचा पराभव करण्यात आनंद मानतो. आपली प्रशंसा करतो. दुसऱ्यावर विश्वास ठेवीत नाही, आपल्या प्रमाणे दुसन्यास ठक समजतो. स्तुतिकरणाऱ्याची स्तुति करतो, हानि-लाभ याचा सारासार विवेक करीत नाही. मरण आले तरी जो लढणे सोडीत नाही. दुसऱ्याने स्तुतिकेल्यास त्याला आपले सर्वस्व अर्पण करतो, कार्य-अकार्यांचा विवेक ठेवीत नाही हे कापोत लेश्यावान् जीवाचे लक्षण समजावे.
४) पीतलेश्या - जाणइ कज्जाकज्जं सेयमसेयं च सव्वसमपासी । दय शरदो य मिदू लक्खणमेयं तु तेस्स ॥
जो कार्य अकार्य याचा विवेक ठेवतो, भक्ष्य- अभक्ष्याचा विवेक तो. सर्व प्राणीमात्राविषयी समता भाव ठेवतो, दया दान पूजा इत्यादि शुभ आचरण करतो. मृदु भाषण करतो ते तेजोलेश्या धारीचे लक्षण समजावे.
५) पद्मलेश्या - चागी भद्दो चोक्खो उज्जवकम्मो य खमदिबहुगंपि साहुगुरुपूजणरदो लक्खणमेयं तु पम्मस्स ||
दानी, भद्रपरिणामी, चांगले कार्य करणारा, उद्योगशील, क्षमाशील, देवशास्त्र गुरू यांची पूजा करणारा हे पद्मलेश्याधारी जीवाचे लक्षण होय.
६) शुक्ललेश्या - ण य कुणइ पक्खवायं ण विय णिदाणं समो य सव्वेसि । पत्थिय रायद्दोसा हो वि य सुक्कलेस्सस्स ।।
जो पक्षपात करीत नाही. निदान भोगाची इच्छा ठेवीत नाही. समता भाव ठेवतो, राग द्वेष करीत नाही परपदार्थाविषयी ममत्व ठेवीत नाही ते शुक्लश्याधारी जीवाचे लक्षण समजावे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org