________________
तत्त्वार्थसार अधिकार २ र
५ पद्मलेश्या - फलासाठी फळ असलेला गुच्छ तोडण्याची इच्छा करणाऱ्या प्रमाणे जे मंदतर संक्लेश ( मध्यम विशुद्धिरूप) परिणाम त्याला पद्मलेश्या म्हणतात.
६ शुक्ललेश्या - फलासाठी झाडाला त्रास न देता खाली पडलेले फळ घेण्याची इच्छा करणाऱ्या प्रमाणे जे मंदतम संक्लेश ( उत्कृष्ट विशुद्धिरूप) परिणाम त्यास शुक्ललेश्या म्हणतात. कोठेकोठे द्रव्यलेश्या ( शरीराचा वर्ण) हा भावलेश्यानुरूप त्या त्या लेश्यावर्णाचा असतो. परंतु कोठे कोठे भावलेश्या व द्रव्यलेश्या यामध्ये विषमता देखील असते. गोमटसार ग्रंथामध्ये सहा लेश्या परिणामाचे स्वरूप वर्णन केले आहे.
१) कृष्णलेश्या - चंडो ण मुचइ वेरं भंडणसीलो य धम्मदयरहिओ । दुट्टो ण य एदि वसं लक्खणमेयं तु किण्हस्स ||
९५
तीव्र क्रोधी, दीर्घकाल वैरभाव ठेवणारा, कलहप्रिय, धर्म दयाभाव न ठेवणारा, दुष्ट, कोणाच्यावश-आधीन न होणारा तो कृष्णलेश्याधारी
समजावा.
२) नील्लेश्या - मंदो बुद्धि विहोणो, णिविण्णाणी य विसय लोलोय । णिद्दावचनबहुलो धण धण्णे होदि तिव्व सण्णाय । माणी मायी य तहा आलस्सो चेव भेज्जो य ॥ लक्खण मेयं भणियं समासदो णीललेस्सस्स ||
मंद - आळशी, बुद्धि विहीन विवेक रहित, विषयलंपट, मानी, मायावी, आळशी, दुर्भेदी निद्रालु, दुसन्यास ठकविणारा, धन धान्य परिग्रहाविषयी तीव्र आसक्ती ठेवणारा, नीललेश्यावाला जाणावा.
३) कापोतलेश्या - रूसइ दिइ अण्णे दूसइ बहुसो य सोयभय बहुलो । असुयइ परिभवइ परं पसंसये अध्वयं बहुसो ॥
ण य पत्तियइ परं सो अप्पाणमिव परं विमण्णंतो । थूसइ अभित्युवंतो ण य जाणइ हाणि वड्ढि वा ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org