SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 139
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २ रा १० लेश्या मार्गणा योगप्रवृत्तिर्भवेल्लेश्या कषायोदय रंजिता । भावतो द्रव्यतः काय नामोदय कृताङ्गरुक् ।। ८८ ॥ कृष्णा नीला च कापोता पीता पद्मा तथैव च । शुक्ला चेति भवत्येषः द्विविधाऽपि हि षड्विधा ।। ८९ ॥ अर्थ- कषायाच्या उदयाने अनुरंजित अशी मन-वचन-कायेच्या अवलंबनाने आत्मप्रदेश परिस्पंदक्रियारूप जी योगप्रवृत्ति तिला लेश्या म्हणतात. लेश्या २ प्रकारची आहे, १ भावलेश्या २ द्रव्यलेश्या १ भावलेश्या- कषायोदयजनित जी योगप्रवृत्ति तिला भावलेश्या म्हणतात. २ द्रव्यलेश्या- शरीरनामकर्माच्या उदयाने शरीराचा जो बाह्य वर्ण त्याला द्रव्यलेश्या म्हणतात. लेश्येचे ६ भेद आहेत १ कृष्ण २ नील ३ कापोत ४ पीत ५ पद्म ६ शुक्ल. १ कृष्णलेश्या- फलासाठी मूळापासून झाड उपडण्याची इच्छा करणान्याप्रमाणे जे तीव्रतम (उत्कृष्ट) संक्लेश परिणाम त्यास कृष्णलेश्या म्हणतात. २ नील- फलासाठी झाडाच्या बुंधापासून तोडण्याची इच्छा करणा-या प्रमाणे तीव्रतर ( मध्यम ) संक्लेश परिणाम त्यास नीललेश्या म्हणतात. ३ कापोत- फलासाठी झाडाची शाखा (फांदी) तोडण्याची इच्छा करणा-या प्रमाणे जे तीव्र (जघन्य) संक्लेश परिणाम त्याला कापोत लेश्या म्हणतात. ४ पीत- फलासाठी फळ असलेली उपशाखा (लहानफांदी) तोडण्याची इच्छा करणाऱ्या प्रमाणे मंद संक्लेश (जघन्य विशुद्धिरूप) जे परिणाम त्याला पीत लेश्या म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy