SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 138
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तस्वार्थसार अधिकार २ रा चक्षुर्दर्शन मेकं स्यादचक्षुर्दर्शनं तथा । अवधिदर्शनं चैव तथा केवल दर्शनं ।। ८७ ।। अर्थ- दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम किंवा क्षय झाला असताना जीवादिक पदार्थाचे जे सामान्य सत्तामात्र अवलोकन ( प्रतिभास ) त्यास दर्शनचेतना किंवा दर्शनोपयोग म्हणतात. दर्शनोपयोगाचे ४ भेद आहेत. १ चक्षुदर्शन, २ अचक्षुदर्शन, ३ अवधिदर्शन, ४ केवलदर्शन. ९३ १ चक्षुदर्शन - चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय जीवाना चक्षुरिंद्रिय मतिज्ञान होण्यापूर्वी जो पदार्थाचा सामान्य सत्तामात्र प्रतिभास होतो त्यास चक्षुदर्शन म्हणतात. २ अचक्षुदर्शन- चक्षुशिवाय इतर चार इंद्रियानी होणाऱ्या मतिज्ञानापूर्वी जो पदार्थाचा सामान्य सत्तामात्र प्रतिभास होतो त्यास अचक्षुदर्शन म्हणतात हे एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सर्व जीवाना होते. ३ अवधिदर्शन - अवधिज्ञानापूर्वी जो पदार्थाचा सामान्य सत्तामात्र प्रतिभास होतो त्यास अवधिदर्शन म्हणतात. अवधिज्ञानी देव नारकी - तिर्यंच मनुष्य याना हे अवधिदर्शन होते. ४ केवलदर्शन - केवलज्ञानाबरोबर युगपत् जो पदार्थाचा सामान्य सत्तामात्र प्रतिभास होतो त्यास केवलदर्शन म्हणतात. १-२ चक्षुदर्शन - अचक्षुदर्शन १ ते १२ गुणस्थानपर्यंत सर्व जीवाना ( मिथ्यादृष्टि - सम्यग्दृष्टि सर्वाना ) होते. ३ अवधिदर्शन - अवधिज्ञानी, सम्यग्दृष्टी जीवाना (देव नारकी - तिर्यंच - मनुष्य ) या सर्वाना होते. मिथ्यादृष्टि विभंगावधिज्ञानाला अवधिदर्शन होत नाही. त्याना चक्षुदर्शन अचक्षु दर्शनजन्य कुश्रुतज्ञानपूर्वक विभंगावधिज्ञान होते. Jain Education International ४ केवलदर्शन- केवलज्ञानी सर्वज्ञ ( गुण. १३-१४ ) सर्वाना होते. याप्रमाणे दर्शन मार्गणेचे चार भेद आहेत. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy