SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 137
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ९२ तत्त्वार्थसार अधिकार २ रा २ छेदोपस्थापना - सामायिका पासून च्युत झाले असता त्यामध्ये पुनः स्थिर राहण्याचा अभ्यास करणे त्यास छेदोपस्थापना चारित्र म्हणतात. ( गुण. ६ वे ९ ) ३ परिहारविशुद्धि विहारकरताना जमिनीवरून अधर चालण्याची ऋद्धि प्राप्त होणे त्यास परिहारविशुद्धिचारित्र म्हणतात. ( गुण ६ ते ७ ) ४ सूक्ष्मसांपराय- स्थूल कषायांचा अभाव होऊन सूक्ष्म लोभ शिल्लक राहिला असताना जी परिणामाची विशुद्धि त्याला सूक्ष्मसांपरायचारित्र म्हणतात. ( गुण. १० ) अभाव ( उपशम किंवा क्षय ) ५ यथाख्यात- कषायांचा झाला असताना जसे आत्म्याचे स्वरूप आहे त्यात उपयोग स्थिर होणे यास यथाख्यातचारित्र म्हणतात. ( गुण. ११ ते १४ ) ६ विरताविरत ( संपमासंयम - देशसंयम ) - अप्रत्याख्यानावरण कषायाचा क्षयोपशम झाला असता त्रसजीवाच्या हिंसेचा त्यागरूप परंतु स्थावर जीवाच्या हिंसेचा प्रयोजन कार्यवश त्याग करू शकत नाही असे विरनअविरतरूप जीवाचे जे मिश्र परिणाम संयमासंयम किंवा देशसंयमचारित्र म्हणतात. ( गुण. ५ ) त्याला ७ असंयम - षट्काय जीवाच्या हिंसाप्रवृत्तीमुळे होणारी ६ प्रकारची अविरतिरूप व पाच इंद्रिये व मन यांच्या विषयामध्ये होणाऱ्या प्रवृत्तिमुळे होणारी ६ प्रकारची अविरतिरूप परिणति त्यास असंयमभाव म्हणतात ( गुण. १ ते ४ ) या प्रमाणे संयम मार्गणेचे ७ भेद आहेत. ९ दर्शन मार्गणा दर्शनावरणस्य स्यात् क्षयोपशामसन्निधौ । आलोकनं पदार्थानां दर्शनं तच्चतुविधं Jain Education International For Private & Personal Use Only ॥ ८६ ॥ www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy