SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 136
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २ रा आहेत. १ हास्य, २ रति, ३ अरति, ४ शोक, ५ भय, ६ जुगुप्सा, ७ नपुंसकवेद, ८ स्त्रीवेद, ९ पुरूषवेद या नोकषायांचा उदय सामान्यपणे १ ते ९ गुणस्थानापर्यंत असतो. ७ ज्ञान मार्गणा वर्णन तत्त्वार्थस्यावबोधो हि ज्ञानं पंचविधं भवेत् । मिथ्यात्वपाटककलुषमज्ञानं त्रिविधं पुनः ॥ ८३ ।। अर्थ- जीवादि तत्वांचे हेयउपादेयरूप यथार्थ भेदविज्ञान त्यास सम्यग्ज्ञान म्हणतात. सम्यग्ज्ञानाचे ५ भेद आहेत. १ मतिज्ञान, २ श्रूतज्ञान, ३ अवधिज्ञान, ४ मनःपर्यथज्ञान, ५ केवलज्ञान. यापैकी पहिली तीन ज्ञाने जेव्हा मिथ्यात्वाच्या उदयाने कलुषित-विपरीतरूप परिणमतात तेव्हा ती अज्ञाने म्हटली जातात. ते विपरीतज्ञानस्वरूप अज्ञान तीन प्रकारचे आहे. १ कुमतिज्ञान, २ कुश्रुत ज्ञान, : कुअवधिज्ञान (विभंगज्ञान) या प्रमाणे ज्ञानमार्गणेचे ८ भेद आहेत. ८ संयम मार्गणा संयमः खलु चारित्रमोहस्योपशमादिभिः प्राणस्य परिहारः स्यात् पंचधा स च वक्ष्यते ।। ८४ ।। विरता विरतत्वेन संयमासंयमः स्मृतः । प्राणिधाताक्षविषयभावेन स्यादसंयमः ॥ ८५ ॥ अर्थ- चारित्र मोहकर्माचा उपशम-क्षय-क्षयोपशम झाला असताना जे आत्म्याचे वीतरागरूप परिणाम होतात त्यास संयम म्हणतात. ज्यामध्ये षट् काय जीवांच्या हिंसेचा परिहार-त्याग नियमरूपाने असतो त्यास प्रामुख्याने संयम किंवा चारित्र म्हणतात. संयमाचे ५ भेद आहेत. १ सामायिक, २ छेदोपस्थापना, ३ परिहार विशुद्धी, ४ सूक्ष्मसांपराय, ५ यथाख्यात. १ सामायिक- समय म्हणजे आत्मा. स्थिर चित्ताने आत्म्याची निरंतर भावना भावणे ते सामायिक चारित्र होय (गुण. ६ ते ९) Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy