________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
अर्थ- जीवाचा जो परिणाम जीवाच्या चारित्र परिणामाचा घात करतो त्याला कषाय म्हणतात. कषायाचे चार भेद आहेत. ५ क्रोध, २ मान, ३ माया, ४ लोभ. कषायाचे चार प्रकार आहेत. १ अनंतानुबंधी. २ अप्रत्याख्यानावरण, ३ प्रत्याख्यानावरण, ४ संज्वलन.
१ पहले अनंतानुबंधी कषाय सम्यक्त्व व चारित्र गुणाचा घात करतात. गुणस्थान ४ पासून अनंतानुबंधीचा अभाव असल्यामुळे सम्यग्दर्शन सहित आत्मानुभूतिरूप स्वरूपाचरण चारित्र (सम्यकत्वचरण चारित्र ) प्रगट होते.
२ जे कषाय थोडादेखील प्रत्याख्यान-त्याग-देशसंयम होऊ देत नाहीत त्यास अप्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात. यांचा अभाव (क्षयोपशम ) झाल्याने पाचव्या गुणस्थानात देशव्रत धारण करतो
३ जे कषाय मुनीचे सकलसंयमरूप परिणाम होऊ देत नाहीत त्यास प्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात. यांचा क्षयोपशम झाला असताना जीव ६ व्या प्रमत्तअप्रमत्तगुणस्थानात मुनीचे सकलसंयमरूप महाव्रत धारण करतो.
४ जे कषाय यथाख्यात चारित्र होऊ देत नाहीत त्यास संज्वलन कषाय म्हणतात.
अनंतानुबंधीचा उदय हा पहिल्या व दुसऱ्या गुणस्थान पर्यंतअसतो अप्रत्याख्यानावरण कषायाचा उदय १ ते ४ गुणस्थानापर्यंत असतो प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय १ ते ५ गणस्थानपर्यंत असतो. संज्वलन कषायाचा उदय १ ते १० गुणस्थानपर्यंत असतो.
अकराव्या उपशांतमोह गुणस्थानात संपूर्ण कषायांचा उपशम असतो. बाराव्या क्षीणमोह गुणस्थानात संपूर्ण कषायांचा क्षय झालेला असतो. कषायाप्रमाणे नोकषाय देखील चारित्र गुणाचे किंचित घात करणारे आहेत म्हणून त्यांना नोकषाय म्हणतात. नोकषायाचे ९ भेद १ टोप- आद्याः सम्यक्त्व चारित्रे व्दितीया घ्नन्त्यणुव्रतं ।
तृतीयाः संयमं ध्यन्ति यथाख्यातं तुरीयकाः।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org