________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
उत्पादः खलु देवीनां ऐशानं यावादिष्यते ।
गमनं त्वच्युतं यावत् पुंवेदा हि ततः परं ॥ ८१ ।।
अर्थ- नारकी जीव व संमूर्च्छन ज जीवाना जननेंद्रियाच्या अभावामुळे द्रव्य वेद व भाववेद नपुंसकच असतो. पल्यप्रमाण असंख्यात वर्ष आयुष्य धारण करणारे भोगभूमीतील तिर्यंच मनुष्य व देव यांना नपुंसकलिंग नसते. त्यांना स्त्रीवेद व वेद हे दोनच वेद असतात.
बाकीचे कर्मभूमिज तिर्यंच मनुष्य याना तीन प्रकारचे वेद असू शकतात. स्वर्गामध्ये देवींचा उत्पाद सौधर्म ऐशान स्वर्गापर्यंतच होतो. वर होत नाही. परंतु वरील अच्युत स्वर्गापर्यंतचे देव खाली सौधर्म- ऐशान स्वर्गात येऊन आपापल्या देवीना वर घेऊन जाऊ शकतात. देव- नारकी भोगभूमीतील जीवांचा जो द्रव्यवेद असतो तोच भाववेद असतो. परंतु इतर मनुष्य व तिर्यंच यांच्या द्रव्यवेद व भाववेदामध्ये असमानता देखील असू शकते. द्रव्यवेद ज्यांचा नपुंसकवेद असेल ते मिथ्यादृष्टि असतात. द्रव्यवेद स्त्रीवेद ज्यांचा असतो असे तिर्यंच मनुष्य १ ते ५ गुणस्थानपर्यंत चढू शकतात. व्रतीश्रावक होऊ शकतात. संयम धारण करू शकत नाहीत. परंतु द्रव्यवेद ज्यांचा पुरूष वेद असतो ते भाववेदाने पुंवेद स्त्रीवेद नपुंसकवेद सहित असले तरी सम्यग्दृष्टी श्रावक मुनी होऊ शकतात. नवव्या गुण-स्थानापर्यंत सवेद भागापर्यंत चढू शकतात.
भूतपूर्वनयाने वेदातीत झाल्यावर देखील भाववेदाच्या अपेक्षेने वेदमार्गणेत भावस्त्रीवेदी भावनपुंसकवेदी यांची गुणस्थाने १४ सांगितली आहेत. परंतु त्यांचा द्रव्यवेद पुरुषवेदच असतो. भाववेदाने वेदातीत असून देखील द्रव्यवेद पुरुषवेद असल्यामुळे पुरुषवेदीना देखील १४ गुणस्थाने भूतपूर्वनयाने सांगितली आहेत.
६ कषाय मार्गणा चारित्रपरिणामानां कषायः कषणान्मतः । क्रोधो मानस्तथा माया लोभश्चेति चतुर्विधः ।। ८२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org