________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
१ गर्भजन्म - माता - पित्याच्या रजोवीर्यं संयोगापासून गर्भधारणा होऊन जे औदारिक उत्पन्न होते तो गर्भजन्म म्हटला जातो.
२ संमूर्च्छन जन्म- माता- पित्याच्या रजो- वीर्याशिवाय निसर्गतः नो कर्म वर्गणे पासून हवा-पाणी-ऊन यांच्या सयोगापासून जे औदारिक शरीर उत्पन्न होते त्यास संमूच्छेन जन्म म्हणतात.
एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत सर्व जीव संमूर्च्छनज असतात. संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच व मनुष्य यामध्ये काही गर्भज व काही संमूर्च्छनज
असतात.
८७
पावसाळ्यात हवा-पाणी यांच्या संयोगापासून जे बेडूक- साप उत्पन्न होतात ते संमूर्च्छन संज्ञीपंचेंद्रिय तिर्यंच होत. तसेच स्त्रीच्या काखेमध्ये योनीमध्ये जे घाम वगैरे पासून मनुष्य उत्पन्न होतात त्यांना संमूर्च्छन मनुष्य म्हणतात. ते सूक्ष्म असतात. ते डोळयाने दिसत नाहीत.
३ देव नारकी यांचे वैक्रियिक शरीराच्या उत्पत्तिला उपपाद जन्म म्हणतात. देवांचे शरीर उपपाद शय्येपासून उत्पन्न होते तो देवांचा उपपाद जन्म होय. तसेच नारकी जीवांची उत्पत्ति घंटेसारख्या आकाराच्या नरक बिळाच्या उपपाद स्थानातून खाली डोके, वर पाय अशा उलट्या आकाराने होते तो नारकी जीवांचा उपपाद जन्म होय.
आहारक शरीराचे वर्णन
अव्याघाती शुभः शुद्धः प्राप्तदेर्यः प्रजायते ।
संयतस्य प्रमत्तस्य स खल्वाहारकः स्मृतः ॥ ७८ ॥
अर्थ- प्रमत्तसंयत नामक ६ व्या गुणस्थानवर्ती ऋद्धिधारी मुनींना जेव्हा तत्वचिननामध्ये शंका उत्पन्न होते तेव्हा ती शंका निवारण होण्यासाठी अथवा अकृत्रिम चैत्यालयाची वंदना करण्यासाठी त्यांच्या औदारिक शरीरातून जो एक अरत्नि ( मुंडाहात ) प्रमाण मनुष्याच्या आकाराचा, शुभ्रवर्णाचा, तेज:पुंज जो पुतळा निघतो त्या पुतळ्याच्या शरीरास आहारक शरीर म्हणतात. हा पुतळा सूक्ष्म असल्याने
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org