________________
८२
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
अर्थ- मनोयोग ४ प्रकारचा आहे. १ सत्यमनोयोग, २ असत्यमनोयोग, ३ सत्यमृषा (उभय) मनोयोग, ४ असत्य मृषा (अनुभय) मनोयोग.
वचनयोग भेद वचोयोगो भवेत् सत्यो मषा सत्यमृषा तथा । तथाऽसत्यमृषा चेति वचोयोग श्चतुर्विधः । ७० । अर्थ- वचनयोग ४ प्रकारचा आहे.
१ सत्यवचन योग- सम्यग्ज्ञानपूर्वक जे वचन तो सत्यवचनयोग. जसे- जलाला जल म्हणणे.
२ असत्यवचनयोग- मिथ्याज्ञानपूर्वक जे वचन तो अगत्यवचनयोग जसे- मृगजलाला जल म्हणणे.
३ सत्यमृषा (उभव) वचनयोग-- कथंचित् सत्य, कथंचित् असत्य तो उभय वचनयोग.
४ असत्यमृषा (अनुभय) वचनयोग- आमंत्रण, आज्ञा, याचना रूपवचन त्यास अनुभय वचन म्हणतात. (सत्य व मृषा यानी रहित)
काययोग भेद औदारिको वैक्रियिकः कायश्चाहारकश्च ते । मिश्राश्च कार्मणश्चैव काययोगोऽपि सप्तधा । ७१ ।
अर्थ- काययोग ७ प्रकारचा आहे. १ औदारिक काययोग, २ औदारिक मिश्र काययोग, ३ वैक्रियिक काययोग, ४ वैक्रियिक मिश्रकाययोग, ५ आहारक काययोग, ६ आहारक मिश्रकाययोग, ७ कार्भागकाययोग.
मनुष्य व तिर्यंचाना जन्मघेताना प्रथम अंतर्मुहुर्त पर्यंत औदारिक मिश्रयोग असतो. नंतर औदारिक काययोग असतो. देव व नारकी यांना जन्म घेताना प्रथम अंतर्मुहर्त पर्यंत वैक्रियि कमिश्र काययोग असतो. नंतर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org