________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
वैक्रियिक काययोग असतो. आहारक ऋद्धिधारी मुनीना आहारकशरीर उत्पन्न होताना प्रथम अंतर्मुहूर्त पर्यंत आहारक मिश्रयोग असतो. नंतर आहारक काययोग असतो. विग्रह गतीतील जीवाना कार्मणकाययोग असतो.
औदारिकादि शरीरांची परस्पर सूक्ष्मता
औदारिको वैयिक स्तथाऽऽहारक एव च । तैजसः कार्मणश्चैवं सूक्ष्माः सन्ति यथोत्तरं । ७२ । असंख्येयगुणौ स्यातामाद्यादन्यौ प्रदेशतः । यथोत्तरं तथाऽनन्तगुणौ तेजसकार्मणी । ७३ ।
अर्थ- शरीराचे ५ भेद आहेत. १ औदारिक, २ वैक्रियिक, ३ आहारक, ४ तैजस, ५ कार्माण. ही शरीरे क्रमाने उत्तरोत्तर सूक्ष्मसूक्ष्म आहेत. परंतु प्रदेशाच्या अपेक्षेने औदारिक शरीरापेक्षा वैक्रियक व आहारक शरीराचे प्रदेश असंख्यातपट जास्त आहेत. तेजस व कार्माण शरीराचे प्रदेश अनंतपट जास्त आहेत.
तेजस व कार्माणशरीर यातील विशेषता उभौ निरूपभोगौ तौ प्रतिघातविवजितौ । 'सर्वस्यानादि सम्बद्धौ स्यातां तेजसकार्मणौ । ७४ । तौ भवेतां क्वचिच्छुद्धौ क्वचिदादारिकाधिकौ । चिद्वैयिकोपेतौ तृतीयाद्ययुतौ क्वचित् । ७५ ।
८३
अर्थ - तेजस व कार्माण शरीर उपभोग रहित आहेत. इंद्रियाच्या द्वारे विषयाचे ग्रहण त्याला उपभोग म्हणतात. विग्रहगतीमध्ये औदारिकादि तीन शरीरे नसतात, इंद्रिये नसतात त्यामुळे तेजस कार्माण शरीर उपभोग रहित असतात. ही दोन शरीरे सूक्ष्म असल्यामुळे त्याना कोणी प्रतिघात अडथळा रोकणे करू शकत नाही. या दोन शरीरांचा प्रत्येक संसारी जीवाशी अनादिकालापासून संबंध असतो. ही दोन शरीरे कोठे कोठे इतर शरीरानी रहित शुद्ध ( केवळ ) एकटी दोनच शरीरे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org