SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 123
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७८ तत्त्वार्थसार अधिकार २ रा कोणाला किती इंद्रिये असतात स्थावराणां भवत्येकमेकैकेन विवर्धयेत् । शम्बूक - कुंथु - मधुप- मर्त्यादीनां ततः क्रमात् ।। ५१ ।। अर्थ - पाच स्थावर एकेंद्रिय जीवाना एक स्पर्शनेंद्रिय असते. आळी-शंख इत्यादि द्वीद्रिय जीवाना स्पर्शन व रसना दोन इंद्रिये असतात मुंगी - मुंगळा आदि त्रींद्रियजीवाना स्पर्शन रसना घ्राण तीन इंद्रिये असतात. माशी- भुंगा आदि चतुरिंद्रिय जीवाना चक्षुसहित चार इंद्रिये असतात. मनुष्य - पशु-पक्षी याना पाच इंद्रिये असतात. एकेंद्रियाचे भेद स्थावराः स्युः पृथिव्यापस्तेजो वायुर्वनस्पतिः । स्वः स्वैर्भेदैः समा ह्येते सर्व एकेंदियाः स्मृताः ।। ५२ ।। अर्थ- स्थावर एकेंद्रिय जीव पाच प्रकारचे आहेत. १ पृथ्वीकायिक २ अपकायिक ( पाणी ) ३ अग्निकायिक ४ वायुकायिक ५ वनस्पतिकायिक यांचे प्रत्येकी पोटभेद अनेक आहेत. द्वींद्रिय जीव कोणते आहेत शम्बूकः शंख शुक्ती वा गण्डूपद- कपर्दकाः । कुक्षिकृम्यादयश्चैते द्वींद्रियाः प्राणिनो मताः ॥ ५३ ॥ अर्थ - शम्बूक शंख, शीप, गण्डूपद कपर्दक ( कवडी ) कांखेत उत्पन्न होणारे कृमि-कीटक हे द्वींद्रिय जीव मानले आहेत. त्रींद्रिय जीव कुंथु: पिपीलिका कुम्भी वृश्चिकश्चन्द्रगोपकाः । घुण - मत्कूण- यूकाद्या स्त्रींद्रियाः सन्ति जन्तवः ।। ५४ ॥ अर्थ- मुंगळा-मुंगी, कुंभी विंचू, इंद्रगोप, धान्यातील घुण कीडे, ढेकूण, उवा इत्यादि त्रींद्रिय जीव आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy