________________
तत्त्वार्थसार अधिकार २ ।
७७
७७
इंद्रियाचे विषय स्पर्शो रसस्तथा गंधो वर्णः शब्दो यथाक्रम ।
विज्ञेया विषयास्तेषां मनसस्तु तथा श्रुतं ।। ४८ ॥ .
अर्थ- स्पर्शनेन्द्रियाचा विषय स्पर्श, रसनेंद्रियाचा विषय रस, घ्राणेद्रियाचा विषय गंध, चक्षुरिद्रियाचा विषय वर्ण, श्रोत्रंद्रियाचा विषय शब्द. गतिज्ञानपूर्वक होणारे पदार्थाचे जे विशेष स्वरूप श्रुतज्ञान तो मनाचा विषय आहे.
इंद्रियाचा पदार्थाशी विषयसंबंध रूपं पश्चत्यसंस्पृष्टं स्पृष्टं शद्वं शृणोति तु । बद्धं स्पृष्टं च जानाति स्पर्श गंधं तथा रसं ।। ४९ ।।
अर्थ- चक्षु पदार्थाशी स्पृष्ट न होता दुरूनच वर्णाचे ज्ञान करतो. कर्ण द्रियाप्रत शद्व स्पाट होऊन ऐकला जातो. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय नें पदार्थाशो स्पृष्ट होऊन स्पर्शाचे, रसाचे, गंधाचे ज्ञान करतात
मन देखील चक्षुप्रमाण पदार्थाशी स्पष्ट न होता पदार्थ समोर असो किंवा नसो तरी मन त्या पदार्थाविषयी विचार करू शकते.
इंद्रियाचे आकार यवनाल मसूरतिमुक्तेन्द्वर्धसमाः क्रमात् ।
श्रोत्राक्षिघ्राणजिव्हाः स्युः स्पर्शनं नैकसंस्थितिः ॥ ५० ॥ अर्थ- श्रोत्रंद्रियाचा आकार यवनाली प्रमाणे पोकळीच्या आकाराप्रमाणे आहे. चक्षुरिद्रियाचा आकार मसुराप्रमाणे गोल बिन्दुरूप आहे. घाणेंद्रियाचा आकार अतिमुक्तवेलीच्या पुष्पाप्रमाणे आहे. जिव्हेंद्रियाचा आकार अर्धचंद्राच्या आकारा सारखा बाणाकार आहे. स्पर्शनेंद्रियाचा आकार अनेक प्रकारचा आहे. द्रव्य मनाचा आकार अष्टदल कमलाच्या आकारासारखा आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org