________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
२ उपकरण - निर्वृत्तिचे जे रक्षण करते त्यास उपकरण म्हणतात. प्रत्येकाचे बाह्य अभ्यंतर असे दोन दोन भेद आहेत.
१ आभ्यन्तर निर्वृत्ति नेत्रादीन्द्रिय संस्थानावस्थितानां हि वर्तनं । विशुद्धात्मप्रदेशानां तत्र निर्वृत्तिरान्तरा ॥ ४१ ॥
अर्थ - नेत्रादिक इंद्रियांच्या आकार प्रमाण विशुद्ध-क्षयोपशम विशिष्ट आत्मप्रदेशाची जी रचना ती अभ्यंतर निर्वृत्ति होय.
२ बाह्य निर्वृत्ति
तेष्वात्मप्रदेशेषु करणव्यपदेशिषु ।
नामकर्मकृतावस्थः पुद्गलप्रयोऽपरा ॥ ४२ ॥
अर्थ - भावेन्द्रिय नामक क्षयोपशम विशिष्ट त्या इंद्रियाकार आत्मप्रदेशप्रमाण जातिनामकर्म व अंगोपांग नामकर्माच्या उदयाने नोकर्मवर्गणारूप पुद्गल स्कंधाची रचना त्यास बाह्य निर्वृत्ति म्हणतात. जसे चक्षुरिद्रियांचे मसुराकार मध्य बिंदु मंडल .
आभ्यन्तर-बाह्य उपकरण
आभ्यन्तरं भवेत् कृष्ण-शुक्ल मंडलकादिकं । बायोपकरणं त्वक्षिपक्ष्मपत्रद्वयादिकं ॥ ४३ ॥
७५
अर्थ - ज्या प्रमाणे नेत्रेंद्रियाच्या मध्यबिंदुमंडला भोवती असणारे कृष्ण- शुक्ल मंडल ते आभ्यन्तर उपकरण होय. डोळयाच्या पापण्या, केस इत्यादि बाह्य उपकरण होय.
भावेन्द्रिय स्वरूप
लब्धिस्तथोपयोगश्च भावेन्द्रियमुदाहृतं ।
सा लब्धिर्बोधरोधस्य यः क्षयोपशमो भवेत् ॥ ४४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org