SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 119
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २ रा १ गति, २ इंद्रिय, ३ काय, ४ योग, ५ वेद, ६ कषाय, ७ ज्ञान, ८ संयम, ९ दर्शन, १० लेश्या, ११ भव्य मार्गणा, १२ सम्यक्त्व मार्गणा, १३ संज्ञी मार्गणा, १४ आहार मार्गणा. शास्त्रामध्ये जीवाचे वर्णन ओघनिर्देशरूपाने १४ गुणस्थान रूपाने केले आहे. आदेश निर्देशरूपाने १४ मार्गणारूपाने केले आहे. १ गति मार्गणा गतिर्भवति जीवानां गतिकर्मविपाकजा। श्वभ्र-तिर्यग-नरामर्त्यगतिभेदाच्चतुविधा ॥ ३८ ॥ अर्थ- गति नामकर्माच्या उदयाने संसारी जीवाची गति चार प्रकारची होते. १ नरकगति, २ तिर्यचगति, ३ मनुष्यगति, देवगति. २ इंद्रियमार्गणा इंद्रियं लिंगमिन्द्रस्य तच्च पंचविधं भवेत् । प्रत्येकं तद् द्विधा द्रव्य-भावेन्द्रियविकल्पतः ॥ ३९ ॥ अर्थ- जाति नामकर्माच्या उदयाने जीवाचे पाच प्रकार आहेत. १ एकेंद्रिय, २ द्वींद्रिय, ३ त्रींद्रिय, ४ चतुरिंद्रिय, ५ पंचेंद्रिय. इंद्र' म्हणजे आत्मा-जीव त्याचे ओळखण्याचे चिन्ह त्यास इंद्रिय म्हणतात. इंद्रिये पाच आहेत. १ स्पर्शनेंद्रिय, २ रसनेंद्रिय, ३ घ्राणेंद्रिय, ४ चक्षुरिंद्रिय, ५ कर्णेद्रिय. याचे प्रत्येकी दोन भेद आहेत. १ द्रव्ये द्रिय, २ भावेंद्रिय. द्रव्येन्द्रिय वर्णन निर्वृत्तिश्चोपकरणं द्रव्येन्द्रियमुदाहृतं । बाहयाभ्यन्तर-भेदेन द्वैविध्यमनयोरपि ।। ४० ॥ अर्थ- द्रव्येन्द्रियाचे २ भेद आहेत. १ निर्वृत्ति, २ उपकरण १ निर्वृत्ति- - इंद्रियाकार पुद्गल प्रदेशाची व आत्मप्रदेशाची रचना टीप- १ इंदनात् इंद्र:आत्मा । Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy