________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
कोणास किती प्राण असतात
कायाक्षायूंषि सर्वेषु पर्याप्तेष्वान इष्यते । वाग व्यक्षादिषु पूर्णेषु मनः पर्याप्तसंज्ञिषु ।। ३५ ।।
अर्थ - कायबल, इंद्रियप्राण, आयुःप्राण हे तीन प्राण सर्व पर्याप्तक, अपर्याप्तक जीवाना असतात. श्वासोच्छ्वास सहित चार प्राण पर्याप्तक जीवाना असतात. वचन प्राण सहित द्वीद्रियापासून असंज्ञि पंचेद्रियापर्यंत सर्व जीवाना, द्रियास ६, त्रींद्रियास ७, चतुरंद्रियास ८, असंज्ञि पंचेंद्रियास ९ प्राण असतात. संज्ञी पंचेंद्रिय जीवाना मनःप्राणसहित
दहा प्राण असतात.
चार संज्ञा ( वांछा)
आहारस्य भयस्यापि संज्ञा स्यान्मैथुनस्य च । परिग्रहस्य चेत्येवं भवेत् संज्ञा चतुविधा ।। ३६ ।।
अर्थ- संसारी जीवाचे विशेष वर्णन करताना सांगतात की, सर्व संसारी जीवाना प्रायः चार प्रकारच्या संज्ञा ( अभिलाषा वांछा ) असतात. १ आहारसंज्ञा, २ भयसंज्ञा, ३ मैथुनसंज्ञा, ४ परिग्रहसंज्ञा, 'आहार-निद्रा-भय-मैथुनानि सामान्यमेतत् पशुभिर्नराणां ' आहार, निद्रा, भय, मैथुनसेवन या चार प्रकारच्या संज्ञा अभिलाषा प्रायः सर्व मनुष्य तिर्यंच ( देव नारकी ) संसारी जीवाना असतात. या चार प्रकारच्या संज्ञेने प्रायः सर्व संसारी जीव दुःखी पीडित असतात.
७३
१४ मार्गणा'
गत्यक्ष काययोगेषु वेदक्रोधादिवित्तिषु ।
वृत्तदर्शन- लेश्यासु भव्यसम्यक्त्व संज्ञिषु ॥
आहारके च जीवानां मार्गणाः स्युश्चतुर्दश ।। ३७ ।। ( षट्पदी ) अर्थ- मार्गणाचे १४ भेद आहेत.
टीप - १ गइ इंदिये सु काये जोगे वेदे कसाय णाणे य । संजय सण-लेस्सा भविया सम्मत्त सणि आहारे ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org