________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
संसारी जीवाचे १४ जीवसमास वर्णन एकाक्षा बादराः सूक्ष्मा द्वयक्षाद्या विकलास्त्रयः । संज्ञिनोऽसंज्ञिनश्चैव द्विधा पंचेन्द्रियास्तथा ॥३०॥ पर्याप्ताः सर्व एवैते सर्वेऽपर्याप्तकास्तथा ।
जीवस्थानविकल्पाः स्युरेते सर्वे चतुर्दश ॥ ३१ ॥
अर्थ- एकेद्रियाचे २ भेद आहेत. १ बादर २ सूक्ष्म. विकलत्रयजीव तीन प्रकारचे आहेत, द्वीद्रिय २ त्रींद्रिय ३ चतुरिंद्रियः पंचेंद्रियाचे दोन भेद आहेत. १ संज्ञी २ असंज्ञी याप्रमाणे एकेंद्रियाचे २ विकलत्रय ३ पंचेंद्रिय २ असे एकूण ७ भेद होतात. यांचे ७ पर्याप्तक-७ अपर्याप्तक असे एकूण जीवसमासाचे १४ भेद आहेत. द्वींद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सर्व बादरच असतात. एकेंद्रियापासून असंज्ञीपंचेंद्रियापर्यंत सर्व असंज्ञी (मनरहित) असतात.
६ पर्याप्ति आहार-देह-करण-प्राणापान विभेदतः । वचो-मनो-विभेदाच्च सन्ति पर्याप्तयो हि षट् ॥ ३२ ।।
अर्थ- पर्याप्तिचे ६ भेद आहे. १ आहारपर्याप्ति २ शरिरपर्याप्ति ३ इंद्रियपर्याप्ति ४ प्राणापान (श्वासोच्छवास) पर्याप्ति ५ वचनपर्याप्ति ६ एनःपर्याप्ति.
१ आहारपर्याप्ति- जीव एका गतितून मरून दुसन्या गतीत जाऊन जन्म घेतो त्यावेळी आपल्या आपल्या गतीस अनुसरून औदारीक शरीररूप किंवा वैक्रियक शरीररूप नोकर्मवर्गणेच्या परमाणुस्कंधाला ग्रहण करण्याच्या योग्यतेची पूर्णतारूप जीवाची जी शक्ती तिला आहार पर्याप्ति म्हणतात. ही आहारपर्याप्ति सर्व पर्याप्तक-अपर्याप्तक जीवाना मारखी असते.
२ शरीरपर्याप्ति- आहार पर्याप्तिच्या योग्यते मुळे आलेल्या शरीरवर्गणारूप नोकर्मवर्गणेच्या परमाणुस्कंधाना शरीराकार रचना रूप
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org