________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
परिणमविण्याची जीवाची शक्ती तिला शरीर पर्याप्ति म्हणतात. पर्याप्तनाकर्माच्या उदयात शरीर पर्याप्तीची योग्यता ज्या जीवाना असते त्याना पर्याप्तक म्हणतात. अपर्याप्तिनामकर्माच्या उदयाने ज्या जीवाना शरीरपर्याप्ति पूर्ण होण्याची योग्यता नसते, शरीर पर्याप्ति पूर्ण न होताच त्यांचे मरण होते, त्याना अपर्याप्तक म्हणतात.
३ इंद्रियपर्याप्ति- शरीरपर्याप्ति पूर्ण होण्याची योग्यता असणाऱ्या पर्याप्तक जीवाना त्या नोकर्म वर्गणा परमाणु स्कंधाना आपापल्या यथायोग्य स्पर्शनेंद्रियादि इंद्रियाकार रचना परीणमविण्याची योग्यतेची पूर्णतारूप जी जीवाची शक्ती तिला इंद्रिय पर्याप्ति म्हणतात.
४ प्राणापानपर्याप्ति- नोकर्म परमाणु स्कंधाना श्वासोच्छवासरूप परिणमविण्याची योग्यतेची पूर्णतारूप जीवाची जी शक्ती तिला प्राणापान पर्याप्ति म्हणतात.
५ वचनपर्याप्ति- भाषावर्गणेच्या परमाणु स्कंधाला वचनरूप, ध्वनिरूप, शब्दरूप परिणमविण्याची योग्यतेची पूर्णतारूप जी जीवाची शक्ती तिला वचनपर्याप्ति म्हणतात.
६ मनःपर्याप्ति- मनोवर्गणेच्या परमाणुस्कंधाला अष्टदलकमलाकार परिणमविण्याची योग्यतेची पूर्णतारुप जी द्रव्यमनरुप जीवाची शक्ती तिला मनःपर्याप्ति म्हणतात.
१ लब्ध्यपर्याप्तक जीवाला शरीरपर्याप्ति पूर्ण न होताच मरण येते म्हणून त्याला अपर्याप्तक म्हणतात.
२ पर्याप्तकजीवाला आपापल्या योग्य पर्याप्तिीचा प्रारंभ तर सर्वांना युगपत् होतो. पण पूर्णता क्रमाक्रमाने होते.
शरीरपर्याप्ती पूर्ण झाल्यावरच शरीरामध्ये इंद्रियादि काचो रचना होऊन त्या त्या इंद्रियाद्वारे विषय ग्रहण करण्याची योग्यता दिसून येते. त्रासोच्छवासरूप श्वसनक्रिया, कंठ आदि स्थानातून वचनध्वनि-आवाज करण्याची वचनक्रिया, मनाच्याद्वारे हित-अहितरूप विचार
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org