________________
तत्वार्थसार अधिकार २ रा
असते परंतु परिणामात मिथ्यात्वाचा उदय आल्यामुळे तो शास्त्रीय दृष्टीने प्रथम गुणस्थानवर्ती मिथ्या दृष्टि म्हटला जातो जर उपशमश्रेणी चढणारा क्षायिक सम्यग्दृष्टी असेल तर ११ व्यातून खाली ७ व्या गुणस्थानापर्यंत येऊन नंतर यथायोग्य काळी क्षपकश्रेणी चढून मोक्षासजातो.
१३ सयोगकेवली १४ अयोगकेवली उत्पन्नकेवलज्ञानो घातिकर्मोदयक्षयात् । सयोगश्चाप्ययोगश्च स्यातां केवलिनावुभौ ॥ २९ ॥
अर्थ- क्षीणकषाय नामक १२ व्या गुणस्थानवर्ती जीव जेव्हा अंत्यसमयात ज्ञानावरण-दर्शनावरण-अंतराय या तीन घातिकर्माचा पूर्णपणे क्षय करतो तेव्हा त्यास जीवाचे स्वाभाविक अनंतचतुष्टयगुण१ अनन्तज्ञान २ अनन्तदर्शन ३ अनन्तसुख ४ अनन्तवीर्य प्रगट होतात. केवलज्ञानाची प्राप्ति होते. सर्वज्ञ-अरिहंत अवस्था प्राप्त होते, या गुणस्थानात अघातिकर्माचा सद्भाव असतो. समवसरण विहाररूप काययोग असतो. म्हणून या गुणस्थानवी जीवास सयोगकेवली म्हणतात. याना दुसरे एकत्ववितर्क शुक्लध्यान असते आयुष्यकर्माची स्थिति संपत असताना शेवटल्या अंतर्मुहर्तात त्यांचा समवसरण विहार बंद होतो. तेव्हा सूक्ष्मक्रियापति नामक तिसरे शुक्लध्यान प्राप्त होतो. विहार बंद झाल्यामुळे योगाचा अभाव होतो म्हणून या गुणस्थानास अयोगकेवली नामक १४ वे गुणस्थान म्हणतात. या गुणस्थानात चवथे व्युपरतक्रियानिवति नामक शुक्लध्यान प्राप्त होते. आयुकर्माची स्थिति पूर्ण होताच बाकीच्या तीन अघाति कर्माबरोबर चारही अघाति कर्माचा पूर्णपणे क्षय होऊन, ऊर्ध्वगमन स्वभाव असल्यामुळे जीव एकसमयात वर लोकाकाशाच्या अंतापर्यंत जाऊन तेथे सिद्धशिलेवर जाऊन विराजमान होतो. पुन: संसारात येत नाही. या प्रमाणे १४ गुणस्थानातील जीव संसारी म्हटले जातात. सिद्धजीव गुणस्थानातीत म्हटले जातात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org