________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
६१
३ प्रत्याख्यानावरण- ज्याच्या उदयाने जीव मुनीचे सकलसंयम धारण करू शकत नाही त्यास प्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात.
४ संज्वलन- ज्याच्या उदयाने जीव यथाख्यात चारित्र पाळू शकत नाही त्यास संज्वलन कशाय म्हणतात.
या चवथ्या गुणस्थानात दर्शनमोह व अनंतानुबंधी यांचा अभाव असल्यामुळे जीवास स्वपर भेदज्ञानपूर्वक आत्मानुभूति लक्षण सम्यग्दर्शनाची प्राप्ति होते परंतु अप्रत्यार पानावरण कर्माचा उदय असल्यामुळे व्रत-संयमरूप त्याग करण्याचा परिणाम होत नाही. म्हणून या गुणस्थानाग अविरत सम्यग्दृष्टि म्हणतात. या गुणस्थानापासून सम्यग्दर्शनज्ञान- चारित्ररूप मोक्षमार्गाचा प्रारंभ होतो. यद्यपि या गुणस्थानात व्रतसंयमरूप चारित्र नसते म्हणून तो असंयत म्हटला जातो. तथापि सम्यक्त्व-बारित्र-घातक अनंतानुबंधी कषायाच्या अभावात आत्मानुभूति स्वरूप सम्यक्त्वा चरण-चारित्र- किंवा स्वरूपाचरण चारित्राचा सदभाव असतो. म्हणून हा चतुर्थ गुणस्थानवर्ती मोक्षमार्गस्थ म्हटला जातो.
५ देशविरत गुणस्थान पाकक्षयात् कषायाणामप्रत्याख्यान रोधिनां । विरताविरतो जीवः संयतासंयतः स्मृतः ॥ २२ ।।
अर्थ- अप्रत्याख्यानावरण कर्माच्या उदय-जय-जयोपशमामुळे पंचपापरू अविरति पासून एकदेश विरत असतो. श्रावकाची अणुव्रते धारण करतो परंतु प्रत्याख्यानावरण कर्माचा उदय असल्यामुळे पूर्णपणे पंचपापांचा त्यागरूप सकल विरत नसतो म्हणून या गुणस्थानास देशविरत, विरताविरत किंवा संयतासंयत अशी नावे आहेत. या गुणस्थानात जीव त्रस हिंसेचा त्याग करतो, संकल्पी हिंसा करीत नाही, परंतु स्थावर जीवाची हिंसा किंवा आरंभी हिंसा-विरोधी हिंसा प्रयोजनवश करावी लागते म्हणून या गुणस्थानास विरताविरत असे म्हटले आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org